घरदेश-विदेशवर्षातून एकदा 'नदी उत्सव' आवश्य साजरा करा; पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'...

वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ आवश्य साजरा करा; पंतप्रधान मोदींचं ‘मन की बात’ मधून आवाहन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे राष्ट्राला संबोधित केले. आपल्या ८१ व्या वेळी सादर होत असलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले. ‘मन की बात’ या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी नद्यांचे महत्त्व सांगितले आणि त्यांना वाचवण्याचे आवाहन केले. यापुढे मोदी म्हणाले, नद्या आपल्यासाठी भौतिक वस्तू नाहीत. आपल्यासाठी नदी एक जिवंत अस्तित्व आहे म्हणूनच आपण नद्यांना आई म्हणतो. ते म्हणाले की माघ महिन्यात आपल्या देशात बरेच लोक गंगा नदीवर किंवा इतर कोणत्याही नदीच्या काठावर संपूर्ण महिना पूजा करतात.

जागतिक नदी दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आज आपण ‘जागतिक नदी दिन’ साजरा करत असल्याने, या कार्यासाठी समर्पित असलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.तसेच मी प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना आणि देशवासियांना विनंती करतो की भारतातील प्रत्येक कोपऱ्यात वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा केला जावा. यापूढे ते असेही म्हणाले की, नद्यांची आठवण करण्याची परंपरा आज नाहीशी झाली असेल किंवा फारच थोड्या प्रमाणात टिकली असेल, परंतु एक मोठी परंपरा होती जी सकाळी नदीत आंघोळ केल्यानंतर मोठ्या, विशाल भारताची यात्रा पूर्ण व्हायची.

- Advertisement -

या कार्यक्रमात नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशभरातील नद्या वाचवण्याची परंपरा, प्रयत्न आणि श्रद्धा यासर्वांना नद्या वाचवत आहे. आपल्या धार्मिक परंपरेशी संबंधित अनेक संत आणि गुरु त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबरोबरच पाण्यासाठी नदी खूप काही करत आहेत. अनेकजण नद्यांच्या काठावर झाडे लावण्याची मोहीम राबवत आहेत, तर नद्यांमध्ये वाहणारे घाणेरडे पाणी थांबवले जात आहे. यापार्श्वभूमीवर वर्षातून एकदा ‘नदी उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदीं यांनी जागतिक नदी दिनानिमित्त केले.


Cyclone Gulab : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीवर धडकणार, रेड अलर्ट जारी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -