घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी २२ सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर, पहिल्यांदा घेणार बायडेन यांची भेट

पंतप्रधान मोदी २२ सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर, पहिल्यांदा घेणार बायडेन यांची भेट

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानने सत्ता काबीज करताच भारतसमोरील दहशतवादी हल्ल्याचा धोका अधिक वाढला आहे. यामुळे जगभरातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरचं अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानवरील जुलूमशाही तालिबानी राजवटीने सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा अमेरिकातील दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेला भेट देऊ शकतात. यादरम्यान मोदी वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कला देखील भेट देऊ शकतात.

यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि ज्यो बायडेन यांची २३ सप्टेंबरला भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदी शिखर परिषदेच्या (QUAD) बैठकीस उपस्थित राहण्यासाठी देखील तयारी करत आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनला भेट देऊ शकतात आणि २३ सप्टेंबरला ते द्विपक्षीय चर्चेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेऊ शकतात. त्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा २४ सप्टेंबर रोजी शिखर परिषदेत (QUAD समिट) सहभागी होऊ शकतात. पंतप्रधान मोदी त्यानंतर २५ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये UNGA च्या ७६ व्या सत्राला संबोधित करतील. उल्लेखनीय बाब म्हणजे क्वाड संघटनेमधील चार देशांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानसह भारताचा समावेश आहे.

मोदी पहिल्यांदा घेणार ज्यो बायडेन यांची भेट

पंतप्रधान मोदी आणि ज्यो बायडेन यांच्यातील ही पहिली समोरासमोर बैठक असेल. यापूर्वी दोन्ही नेते सुमारे ३ वेळा ऑनलाईन बैठकीत भेटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये शेवटचा अमेरिका दौरा केला होता, जेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाउडी मोदी कार्यक्रमाला संबोधित केले होते.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -