घरदेश-विदेशभगव्या कपड्यातील मोदींची ध्यानधारणा हिंदू मतांवर प्रभाव टाकण्यासाठी तर नाही?

भगव्या कपड्यातील मोदींची ध्यानधारणा हिंदू मतांवर प्रभाव टाकण्यासाठी तर नाही?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ येथील एका गुहेत ध्यानधारणेला बसले आहेत. त्यांचे ध्यानधारणेचे काही फोटो प्रसारमाध्यमांवर आले आहेत. यामध्ये त्यांनी भगवा कपडा शरीराला गुंडाळलेले दिसत आहे. त्यामुळे या भगव्या कपड्याच्या ध्यानधारणेत मोदींचा हिंदू मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न जनसामान्यात उपस्थित होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केदारनाथला गेले असून तेथील एका गुहेमध्ये ध्यानसाधनेला बसले आहेत. या गुहेतील आलेल्या फोटोंमध्ये ते ध्यानसाधना करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय त्यांनी अंगाला भगवा कपडा देखील गुंडाळला आहे. त्यांची ही ध्यानधारणा रविवारी सकाळी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान सुरु झाल्यावर संपणार आहे. त्यामुळे भगव्या कपड्यातील मोदींची ध्यानधारणा हिंदू मतांवर प्रभाव टाकण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.

गुहेच्या आजूबाजूला कुणालाही परवानगी नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार संपल्यानंतर शनिवारी सकाळी उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर मोदी केदारनाथ येथील एका गुहेत गेले. या गुहेत जाण्यासाठी ते स्वत: दोन किलोमीटर चालत गेले. प्रसारमाध्यांनी केलेल्या विनंतीला परवानगी देऊन त्यांनी माध्यमांना गुहेच्या आतमधील फोटो काढण्यास परवानगी दिली. सध्या ते ध्यानसाधनेत तल्लीन झाले असून गुहेच्या आजूबाजूच्या परिसरात प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी किंवा इतर कुणालाही परवानगी नाही.

- Advertisement -

भगवा वेष हा आचार संहितेचा छुपा तोडगा?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांमध्ये प्रचारसभांवर बंदी घातली गेली असून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आचार संहिता सुरु असताना तिला बगल देण्यासाठी भगवा वेष हा छुपा तोडगा असू शकतो. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप यांनी ‘आपलं महानगर’ला दिलेल्या प्रतिक्रियेत मोदींनी आज देखील आचार संहितेचा भंग केल्याचे म्हटले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदरही आचारसंहितेचा भंग केल्याचे म्हटले आहे.

मोदी देशाचे प्रमुख की नटसम्राट? – भाई जगताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ येथील एका गुहेत ध्यानसाधनेत तल्लीन झाले आहेत. रविवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान सुरु होईल तेव्हा ते ध्यान सोडणार आहेत. रात्रभर त्यांची ध्यानसाधना सुरु असणार आहे. दरम्यान, त्यांच्या या ध्यानसाधनेवर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी टीका केली आहे. मोदी हे देशाचे प्रमुख आहेत की नटसम्राट? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाई जगताप म्हणाले की, ‘मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये जी काही कामे केली आहेत. त्यावरुन प्रश्न पडतो की ते देशाचे प्रमुख आहेत की नटसम्राट? मोदी देशाचे प्रमुख आहेत. त्यांनी प्रमुख म्हणून एक आदर्श निर्माण करायला हवा. देशातील महत्त्वाच्या संस्थांची आज अवस्था काय आहे? निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. ही बाब देशाच्या पंतप्रधानांना माहित नाही का? भाजपला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी हा शेवटचा पर्याय अवलंबला आहे.’

- Advertisement -

‘१३० कोटी जनतेची शांतता भंग केली’

यापुढे भाई जगताप म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला वेगवेगळ्या कृलुप्त्या अवलंबल्या आहेत. मोदींना आता पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे ते आत्मशांती करत आहेत. मात्र देशातील १३० कोटी जनतेची शांतता भंग करुन त्यांना शांती कशी मिळेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात भाई जगताप म्हणाले की, ‘मोदी सरकारने जनतेला गेल्या पाच वर्षात त्रास दिला. तरुणांना नोकऱ्यांच्या बाबतीत त्रास दिला, शेतकऱ्यांना त्रास दिला, देशभरात विविध जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन जनतेची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -