घर देश-विदेश 21 वर्षांपूर्वी ज्याला पंतप्रधान मोदींनी दिली ढाल, तोच कारगिलमध्ये त्यांच्यासमोर उभा

21 वर्षांपूर्वी ज्याला पंतप्रधान मोदींनी दिली ढाल, तोच कारगिलमध्ये त्यांच्यासमोर उभा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कारगिलमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी एका तरुण लष्करी अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींना खास भेट दिली. ती भेट पाहताच पंतप्रधान मोदीही भावूक झाल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कारगिलमध्ये मेजर अमित यांची भेट घेतली. यावेळी मेजर अमित यांनी मोदींना अतिशय खास फोटो भेट दिला ज्याने साऱ्यांचेच मन जिंकले.

- Advertisement -

मेजर अमित यांनी पंतप्रधान मोदींना भेट दिलेला फोटो 2001 मधील आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा फोटो काढला होता. मोदी गुजरातमधील बालाचडी येथील सैनिक शाळेत गेले त्यावेळी अमित याने सैनिकी शिक्षण घेतले होते, तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. फोटोमध्ये अमित आणि दुसरा विद्यार्थी नरेंद्र मोदींकडून ढाल घेताना दिसत आहेत. तो फोटो आता मेजर अमित यांनी मोदींना आज भेट म्हणून दिला, ज्यातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

- Advertisement -

यावर मेजर अमित यांनी सांगितले की, त्यांनी गुजरातच्या बालाचडी येथील सैनिक शाळेत मोदींची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये त्या शाळेला भेट दिली होती. आज कारगिलमध्ये जेव्हा आम्ही पुन्हा एकमेकांना भेटलो, तेव्हा ती भेट भावनिक पद्धतीची झाली.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ते दरवर्षी न चुकता सीमेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यावेळीही सलग नवव्यांदा ते जवानांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले. या आधी पंतप्रधान मोदी 23 ऑक्टोबर 2014 रोजी सियाचीन, 11 नोव्हेंबर 2015 रोजी पंजाब, 20 ऑक्टोबर 2016 रोजी हिमाचलप्रदेशच्या किन्नौर, 18 ऑक्टोबर 2017 रोजी जम्मू काश्मीरमधील गुरेझ, 7 नोव्हेंबर 2018 रोजी उत्तराखंडमधील हर्षिल, 27 ऑक्टोबर 2019 रोजी राजौरीमधील नियंत्रण रेषेवर, 14 नोव्हेंबर 2022 रोजी जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्ट आणि 4 नोव्हेंबर 2021 रोजी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले.


गोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -