घरअर्थजगतPM Modi On Budget 2022: 100 वर्षांतील भीषण संकट काळातही अर्थसंकल्पातून नवा...

PM Modi On Budget 2022: 100 वर्षांतील भीषण संकट काळातही अर्थसंकल्पातून नवा आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या पाच राज्यांतील गंगेच्या काठी असलेल्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. ''असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “100 वर्षांतील भीषण संकट काळातही या अर्थसंकल्पाने देशाच्या विकासाचा नवा आत्मविश्वास दिला आहे, असे ते म्हणाले आहेत. “या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्यांच्या नव्या शक्यतांनी परिपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. यामुळे ग्रीन नोकऱ्यांचे क्षेत्रही खुले होईल.” अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “देशात प्रथमच हिमाचल, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील भागांसाठी पर्वतमाला योजना सुरू केली जात आहे. या योजनेमुळे डोंगरावर वाहतुकीची आधुनिक व्यवस्था निर्माण होणार आहे. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्या या नवीन शक्यतांनी परिपूर्ण आहे. ”

- Advertisement -

“भारतातील कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेसोबतच गंगा मातेची स्वच्छता आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या पाच राज्यांतील गंगेच्या काठी असलेल्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. ”असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

“या अर्थसंकल्पातील महत्त्वाची बाब म्हणजे गरिबांचे कल्याण हा आहे. प्रत्येक गरीबाकडे पक्के घर, नळाचे पाणी,  शौचालय, गॅसची सुविधा असावी या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यात आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर समान भर देणार” असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, “या अर्थसंकल्पात क्रेडिट गॅरंटीमध्ये विक्रमी वाढ करण्यासोबतच इतर अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या MSME क्षेत्राला संरक्षणाच्या भांडवली बजेटच्या 68% देशांतर्गत उद्योगासाठी राखून ठेवण्याचा मोठा फायदा मिळेल” असं म्हणत त्यांनी या लोकस्नेही आणि प्रगतीशील अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मलाजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

याशिवाय उद्या सकाळी ११ वाजता भाजपाने बजेट आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अर्थसंकल्पाच्या या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.


एअर इंडियाच्या मालकीचे धोरणात्मक हस्तांतरण पूर्ण; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -