घरBudget 2024PM Modi on Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले...

PM Modi on Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींकडून कौतुक, म्हणाले “देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प”

Subscribe

पायाभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार 111 कोटींची तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प हा देशाचा भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करणार आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पानंतर देशाला संबोधित करताना केले आहे.

अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी म्हणाले, “अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2047 मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो. हा अर्थसंकल्प तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करणार आहे. अर्थसंकल्प हा देशाचा भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. आजचा अंर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे. अर्थसंकल्पात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि इनोव्हेशनवर 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात स्टार्टअप्सला करता देण्यात येणाऱ्या सवलतीचा विस्तारची देखील घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार 111 कोटींची तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठवले आहे.”

- Advertisement -

“आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहे. नॅनो डीएपीचा उपयोग, नव्या पशू योजना, पीएम मत्स संपदा योजनेचा विस्तार आणि आत्मनिर्भर तेलबिया अभियान अशा योजनांचा समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच, पण खर्च देखील कमी होईल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -