घरदेश-विदेशPM Modi On Gandhi : दोन कमांडर नसल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे एवढे बोलले;...

PM Modi On Gandhi : दोन कमांडर नसल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे एवढे बोलले; पंतप्रधान मोदींचा टोला

Subscribe

काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबला होता आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार देखील बरखास्त केली होती, असा आरोपीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आज पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मल्लिकार्जु खर्गे बोलत असताना, दोन कमांडर नव्हते, असा अप्रत्यक्ष टोला पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना लागवाल.

मल्लिकार्जुन खर्गेंवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मला त्यांचा खूप आनंद झाला की, त्यांना इतकावेळ बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले, असा प्रश्न मला पडला. खर्गे इतके बोलू शकले कारण त्या दिवशी ते बोलत असताना, दोन कमांडर नव्हते. याचा खर्गेंनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्या दिवशी खर्गे म्हणाले, देशात एनडीए 400 जागा जिंकेल.”

- Advertisement -

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

माझ्या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. माझ्या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहेत. काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा दाबला होता आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार देखील बरखास्त केली होती. काँग्रेसने वृत्तपत्रांना टाळे देखील लावले होते आणि आता हिच काँग्रेस आम्हाला लोकशाही शिकवत आहेत”, असा टोमणाही त्यांनी काँग्रेसला मारला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

सैन्याचे आधुनिककरणापासून रोखले

पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी दहशतवाद्याला खतपाणी घातले, त्यांनी नॉर्थ इस्टमध्ये मागासलेपणा वाढला आणि कट्टरावादाला वाढू दिला. तसेच काँग्रेसने आपल्या देशाची जमीनही शत्रूला दिले आणि सैन्याचे आधुनिककरणापासून रोखले. काँग्रेस स्वातंत्र्यानंतर अनेक दशके गोंधळात होती”, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -