Homeदेश-विदेशPM Modi : पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची सडकून टीका

PM Modi : पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील; पंतप्रधान मोदींची सडकून टीका

Subscribe

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांच्या संबोधनात लोकशाहीच्या चार स्तंभावर त्यांनी भर दिला. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे देशासाठी खूप मोठी देण आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात लोकशाहीचे चार स्तंभ मजबूत करण्यावर जोर दिला त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीतच दिसतील अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला. (PM Modi Opposition will be seen in audience gallery in next election Criticism of Prime Minister Modi)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांच्या संबोधनात लोकशाहीच्या चार स्तंभावर त्यांनी भर दिला. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे देशासाठी खूप मोठी देण आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात लोकशाहीचे चार स्तंभ मजबूत करण्यावर जोर दिला त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यंदाचा आपला प्रजासत्ताक हा 75 वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला. तर जेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या जेव्हा संसदेत येत होत्या, त्या सेंगोलचा संसदेतील प्रवास हे सगळं चित्र आकर्षक होतं. नवीन संसदेत आपण सगळे जण आहात हे दृष्य नेहमी स्मरणात राहीन असे म्हणतच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले.

पुढे बोलताना पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणाले की, नव्या संसदेतील हे चित्र अविस्मरणीय आहेच सोबतच समोर विरोधी बाकावर बसलेले विरोधक हे पुढील अनेक वर्ष तसेच विरोधी बाकावरच दिसतील. एवढेच नव्हे तर पुढील निवडणुकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील. विरोधकांकडे निवडणूक लढविण्याचीही ताकदच नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा : Acharya Pramod : काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांचा पक्षाला घरचा अहेर, खर्गेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

भारतीय अर्थव्यवस्था तिसरी अर्थव्यवस्था बनविणार

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आगामी निवडणुकीत आमचा विजय हा निश्चितच आहे. एवढेच नव्हे तर माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत हा जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईन. यासाठी आम्ही 30 वर्ष लागू देणार नाही, ही लवकरच करू, ही मोदी गॅरंटी आहे असेही म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलं.

हेही वाचा : Awhad Vs Paranjape : अजित पवारांवर टीका करणाऱ्या आव्हाडांना परांजपेंचे प्रत्युत्तर

अनेकांची लोकसभेतून राज्यसभेतून जाण्याची तयारी

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजकाल विरोधक ज्या प्रकारे मेहनत करत आहेत, मला ठाम विश्वास आहे की, देवाच्या रूपातील जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. तुम्ही ज्या उंचीवर आहात त्यापेक्षा तुम्ही उंच जाल आणि प्रेक्षक गॅलरीमधूनही गायब व्हाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी पाहतो की तुमच्यापैकी अनेकांनी आगामी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली आहे. तर काहींनी मागील निवडणुकीत जागा बदलली होती, आगामी निवणुकीतही ते निवडणुकीत उभं राहण्यासाठी जागा शोधत आहेत. काहीजण तर लोकसभेतून राज्यसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. एकूणच विरोधक परिस्थिती ओळखून त्यानुसार मार्ग काढत आहेत.