घरदेश-विदेशएक संवेदनशील आणि तळमळीचा नेता, पंतप्रधान मोदींकडून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली

एक संवेदनशील आणि तळमळीचा नेता, पंतप्रधान मोदींकडून मुलायमसिंह यादव यांना श्रद्धांजली

Subscribe

नवी दिल्ली/ मुंबई : समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुलायमसिंह यादव यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायमसिंह यादव यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणीबाणीच्या काळात ते लोकशाहीच्या लढ्यामंधील एक प्रमुख सैनिक होते. संरक्षणमंत्रीपद भूषविताना त्यांनी बलशाली भारत बनविण्याच्या दृष्टीने काम केले. त्यांचे संसदीय कामकाज हे अभ्यासपूर्ण आणि राष्ट्रीयहिताला चालना देणारे होते. लोकनायक जयप्रकाश नारायण आणि डॉ. राममनोहर लोहिया यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, असे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.

- Advertisement -

राजकारणातील एका युगाचा अंत – अमित शाह
अद्वितीय राजकीय कौशल्य असलेले मुलायमसिंह यादव अनेक दशके राजकारणात सक्रिय राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आवाज उठवला. एक विनम्र नेता म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुलायमसिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोहियांच्या विचारसरणीनुसारच राजकीय वाटचाल – शरद पवार
मुलायमसिंह यांच्या निधनामळे देशातील समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. लोहियांच्या विचारसरणीनुसारच त्यांची राजकीय वाटचाल होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम करतानाच त्यांनी देशाच्या राजकारणातही लक्ष दिले. संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कामगिरी खूपच चांगली होती. सर्व विरोधकांनी एकत्र यावे अशी इच्छा होती, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

सामाजिक न्यायाचे खंबीर पुरस्कर्ते – प्रियंका गांधी
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि सामाजिक न्यायाचे खंदे पुरस्कर्ते म्हणून भारतीय राजकारणातील त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -