घरदेश-विदेशPM Modi : जातीच्या नावावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा इशारा; म्हणाले...

PM Modi : जातीच्या नावावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा इशारा; म्हणाले…

Subscribe

संत रविदासजींच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आज अनेक कोटींच्या योजना सुरू केल्या आहेत. मंदिराकडे जाणारे रस्ते, इंटरलॉकिंग ड्रेनेज व्यवस्था, संत्संग भवन आणि प्रसाद घेण्यासाठी विविध सुविधांचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

वाराणसी : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. इंडिया ही देशातील लोकांना जातीच्या नावावर चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांपासून सावध रहावे, असा इशारा टीका पंतप्रधान मोदींनी दिला आहे. घराणेशाही पक्षाला निवडणुकीच्या वेळी दलितांची आठवण येऊ लागते, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लगावला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, घराणेशाही असलेले पक्ष कोणत्याही दलित आणि आदिवासी कुटुंबांना पुढे देऊ इच्छित नाहीत. या घराणे शाही पक्षाने देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती होण्यास कोणी विरोध केला हे सर्वांना माहीत आहे आणि या घराणेशाही पक्षाला निवडणुकीच्या वेळी दलितांची आठवण येऊ लागते. यामुळे तुम्ही त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. गरीब, वंचित, मागासलेले आणि दलितांसाठी आमच्या सरकारचे हेतू स्पष्ट आहेत.

- Advertisement -

 गरीब आणि वंचितांसाठी योजना आखल्या

पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 10 वर्षात विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करत आहोत. यापूर्वी गरिबांना सर्वात शेवटचे मानले जायचे, आज सर्व योजना त्यांच्यासाठी बनवल्या जात आहेत. कोरोनाच्या इतक्या मोठ्या संकटात आम्ही 80 कोटी गरीब लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था केली. आम्ही स्वच्छ भारत योजना मोहीम सुरू केली, प्रत्येक कुटुंबाला शौचालयाचा लाभ दिला. विशेषत: दलित माता-भगिनींना याचा फायदा झाला, कारण त्यांना उघड्यावर शौचालयास जावे लागत होते. शुद्ध पाण्यासाठी जल जीवन अभियान सुरू आहे. 11 कोटींहून अधिक घरांना पाईपने पाणीपुरवठा करण्यात आला. आयुष्मान कार्ड बनवले आहेत. जन धन खाती उघडली आहेत.

हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

- Advertisement -

वाराणसी मिनी पंजाब पंतप्रधान मोदी म्हणाले…

संत रविदासांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी देशभरातील राड्यांचे काशीमध्ये स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, वाराणसी आज मिनी पंजाबसारखे दिसत आहे. तुमच्याप्रमाणेच रविदास यांनी मला पुन्हा पुन्हा त्यांच्या जन्मस्थानी बोलावतात. येथे आल्याने आपले संकल्प पुढे नेण्याची आणि लाखो अनुयायांची सेवा करण्याची संधी मिळते. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. काशीचा खासदार आणि लोकप्रतिनिधी या नात्याने वाराणसीमध्ये मी तुमचे स्वागत करणे आणि तुमच्या सुविधांची विशेष काळजी घेणे ही माझी विशेष जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – HC on Jarange: जरांगेंना हायकोर्टाचा दणका! आंदोलन हिंसक होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार?

मोदींच्या हस्ते संत रविदास पुतळ्याचे लोकार्पण

पंतप्रधान मोदी म्हणाले, संत रविदासजींच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आज अनेक कोटींच्या योजना सुरू केल्या आहेत. मंदिराकडे जाणारे रस्ते, इंटरलॉकिंग ड्रेनेज व्यवस्था, संत्संग भवन आणि प्रसाद घेण्यासाठी विविध सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना केवळ आध्यात्मिक आनंदच मिळणार नाही तर इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते संत रविदास यांच्या नवीन पुतळ्याचे लोकार्पण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी गाडगे महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -