घरताज्या घडामोडीPm Modi in Kedarnath : केदारनाथ पुनर्विकासात कच्छच्या भूकंपाचा अनुभव कामी आला-...

Pm Modi in Kedarnath : केदारनाथ पुनर्विकासात कच्छच्या भूकंपाचा अनुभव कामी आला- पंतप्रधान

Subscribe

भगवान केदारनाथाची यात्रा यापुढच्या काळात अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे. अनेक पायाभूत सुविधा विकास कामांमुळे यापुढच्या काळात भाविकांसाठी अधिक सेवा सुविधा मिळणार आहेत. अनेक योजनांच्या शीलान्यास कार्यक्रमाची घोषणा आज करण्यात आली. उत्तराखंड सरकारच्या माध्यमातून १३० कोटींच्या पायाभूत सुविधा पुनर्विकास प्रकल्पांचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले. या प्रकल्पांमध्ये यात्रेकरूंच्या सुविधेसाठीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वैद्यकीय सेवांचाही यामध्ये समावेश आहे. केदारनाथच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये गुजरातच्या कच्छच्या भूकंपाचा मुख्यमंत्री असतानाचा अनुभव कामी आला,अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. केदारनाथ येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ते बोलत होते. याठिकाणी काम सुरू असताना अनेकदा कामगारांनी निगेटिव्ह तापमानातही काम केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी सकाळी केदारनाथ येथे पोहचले. त्याठिकाणी केदारनाथ बाबाची पूजा आणि जलाभिषेक त्यांनी केला. तसेच केदारनाथ येथे आदी शंकराचार्य यांच्या मूर्तीचे लोकार्पणही त्यांनी केले. चारधाम रस्तेजोड प्रकल्पाचे वेगाने काम होत आहे. येत्या काळात भाविक याठिकाणी केबल कारच्या माध्यमातून येऊ शकतील. यासाठीच्या कामालाही सुरूवात झाली आहे. हेमकुंड साहिबचे दर्शन सोपे होण्यासाठी याठिकाणी रोप-वे तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. उत्तराखंड येथे सातत्याने होणाऱ्या विकासामुळेच याठिकाणी वेगाने विकास कामेही होत आहेत. याचा परिणाम म्हणजे चारधाम यात्रेसाटी येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

- Advertisement -

या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरस्वती संरक्षण भिंत, मंदाकिनी संरक्षण भिंत, पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवर गरूड चट्टी ब्रीज यासारख्या कामांचा समावेश आहे. यात्रेकरूंच्या सुविधेसाठीचे हॉस्पिटल, पर्यटक सुविधा केंद्र अशा अनेक सेवा सुविधा आगामी काळात केदारनाथ येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. नैसर्गिक संकटामुळे या परिसरात अनेक आव्हाने आली होती. उत्तराखंड परिसरातील पूराच्या संकटानंतर मनोमन हा केदारनाथ परिसर पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. आज प्रत्यक्षात येणाऱ्या प्रकल्पांमुळे आणि विकास कामांवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

गुजरातचा मुख्यमंत्री असताना या केदारनाथ परिसरावर आलेले नैसर्गिक संकट पाहिले होते. पण आता नैसर्गिक संकटाच्या आव्हानातून मुक्ती मिळणार आहे. गेल्या काही दिवसात केदारनाथ परिसरात चाललेल्या कामाचा आढावा मी घेत होतो. अनेकदा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माझ्या कार्यालयात बसूनच मी या कामाचा आढावा घेतला. हे काम सुरू असताना कामगारांनी अनेकदा शून्यापेक्षाही कमी तापमान असताना काम केले आहे. अनेक पुरोहित हे नैसर्गिक संकटाच्या कालावधीत आपल्या घरात भाविकांना आश्रय देत स्वतः बाहेर राहत होते, हेदेखील मी पाहिले आहे. पण आता परिस्थिती बदलणार आहे. केदारनाचे नैसर्गिक संकट पाहता हे क्षेत्र पुन्हा उभारी घेईल का अशी अनेकांच्या मनात शंका होती. पण माझ्या मनात मात्र आत्मविश्वास होता. फक्त केदारनाथाच्या आशीर्वादामुळेच हे सगळ शक्य होत आहे, असे मोदी म्ङणाले. माझा कच्छच्या भूकंपातील अनुभव गाठीशी होता. त्यामुळेच केदारनाथाची सेवा करण्याचे सौभाग्य मिळाल्याचे मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा Kedarnath Visit: उद्या पंतप्रधान मोदी केदारनाथला होणार रवाना; भाजपाचा असा आहे देशव्यापी कार्यक्रम

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -