घरदेश-विदेशFarmer Protest: आंदोलन त्वरित मागे घेणार नाही; राकेश टिकैत यांनी मांडली शेतकऱ्यांची...

Farmer Protest: आंदोलन त्वरित मागे घेणार नाही; राकेश टिकैत यांनी मांडली शेतकऱ्यांची भूमिका

Subscribe

केंद्रातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारने वर्षभरानंतर तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी याची घोषणा केली. अशा स्थितीत दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देताना आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, असी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

पंत्परधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. दरम्यान, राकेश टिकैत यांनी ट्विट करत मोदींच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. राकेश टिकैत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा संसदेत कृषीविषयक कायदे रद्द केले जातील. एमएसपीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही सरकारने चर्चा करायला हवी,” असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

यूपी, हरियाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी दिल्ली-एनसीआरच्या चार सीमेवर (शाहजहानपूर, टिकरी, सिंघू आणि गाझीपूर) जवळपास गेल्या एक वर्षापासून तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलक २६ नोव्हेंबर २०२० पासून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत होते.

- Advertisement -

मोदींनी मागितली देशाची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.


हेही वाचा – Farm Laws : पंतप्रधान मोदींनी रद्द केलेले कृषी कायदे काय होते आणि विरोध का होता?


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -