वाढत्या तापमानाबद्दल पीएम मोदींची महत्वाची बैठक, मान्सूनबद्दल घेणार आढावा

देशातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मान्सून देखील काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेणार आहेत. नुकतचं मोदींनी तीन दिवसांचा युरोपीय दौरा पूर्ण केला आहे. यामध्ये त्यांनी फ्रान्स, जर्मनी आणि डेन्मार्क या तीन देशांमध्ये दौरा केला आहे. मात्र, सर्वात मह्त्त्वाचं म्हणजे मोदी दिव सभरात सात ते आठ सभा घेणार आहेत.

देशातील अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ४६-४७ अंश सेल्सिअसपर्यंत होता. त्यामुळे उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली होती. राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रातील विदर्भ या पाच भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दिल्लीत १९५१ नंतर या वर्षीचा दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिन्याची नोंद झाली. या काळात ४०.२ अंश सेल्सिअस मासिक सरासरी कमाल तापमान नोंदवण्यात आले.

गेल्या आठवड्यात मोदींनी वाढत्या तापमानाबद्दल, लँडफिल्स, कचऱ्याचे ढिगारे आणि जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांबद्दल तीव्र इशारा दिला होता. देशातील तापमान झपाट्याने वाढत असून विविध ठिकाणी आगीच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तापमानाचा पारा ४६ अंशाच्या पार पोहोचला होता. अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.


हेही वाचा : ‘त्या पार्टीत’ राहुल गांधींबरोबर होते ज्योतिरादित्य सिंधिया, काय आहे फोटो मागचे सत्य?