घरAssembly Battle 2022युवराजांसाठी 2014 मध्ये मला हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले, मोदींचा पंजाबमधून राहुल...

युवराजांसाठी 2014 मध्ये मला हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले, मोदींचा पंजाबमधून राहुल गांधींवर निशाणा

Subscribe

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले आहे. यावर चन्नी यांनी प्रतिक्रिया देताना आपण मुख्यमंत्री आहोत कोणी दहशतवादी नाही असा सवाल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधून काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. युवराजांसाठी २०१४ साली माझे हेलिकॉप्टर उड्डाण कऱण्यापासून रोखण्यात आले होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मोदी पंजाबमधील जालंधरमध्ये संबोधित करत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाला होता. यावरुनही पंतप्रधानांनी काँग्रेसला निशाणा केलं तसेच काँग्रेस नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालंधरमध्ये सभा घेतली होती. यावेळी मोदींनी २०१४ मधील एक घटना सांगत काँग्रेसचा समाचार घेतला आहे. मोदी म्हणाले की, तुम्ही हैराण व्हाल, काँग्रेसचे नेते आणि युवराजांचा अमृतसरमध्ये एक कार्यक्रम होता. त्यांच्यासाठी मला हेलिकॉप्टरमधून उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले होते. पठानकोठला पोहचण्यासाठी दीड तास उशीर झाला होता. यानंतर पठानकोटवरुन उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे हिमाचलमधील दोन कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. विरोधकांना त्रास देणे काँग्रेसच्या नितीमध्ये असल्याचा घणाघात मोदींनी केला आहे. दोन सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्या तेव्हा काँग्रेस सेनेकडून पुरावा मागत होते आणि पाकिस्तानसोबत दोस्ती वाढवत होते असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला आहे.

- Advertisement -

चरणजीत सिंह चन्नींच्या हेलिकॉप्टर उड्डाण रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये दौऱ्यावर असल्यामुळे नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीसुद्धा पंजाबमध्ये आले आहेत. राहुल गांधींची सभा होशियारपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी जाण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले आहे. यावर चन्नी यांनी प्रतिक्रिया देताना आपण मुख्यमंत्री आहोत कोणी दहशतवादी नाही असा सवाल केला आहे.

पंजाबला सक्षम सरकारची गरज

पंजाब सीमेवर असलेले राज्य आहे. यासाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी महत्त्वाची आहे. पंजाबला अशा सरकारची गरज आहे. जी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसोबत महत्वाची पावलं उचलेल. पंजाबच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कोणतिही महत्वाचे पावलं उचलत नाही. ज्यांना काम करायचे असते त्यांच्या अडचणी वाढवण्यात येतता. यामुळेच कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. कॅप्टन यांनी सांगितले होते की, पंजाबचे सरका भारत सरकारद्वारे चालवण्यात येत होती. भारत सरकारसोबत कॅप्टनने काम केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले असल्याचा घणाघात मोदींनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Punjab Elections 2022: सत्तेत आल्यावर एक लाख नोकऱ्यांचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -