Russia Ukraine War: युक्रेनमधून १ हजार भारतीयांची वापसी, ऑपरेशन गंगावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध पेटले असून युक्रेनमधून भारतीय नागरिकांना देशात आणण्यासाठी अनेक मार्गांचा वापर केला जात आहे. युक्रेनमधून १ हजार भारतीयांची वापसी करण्यात आल्याचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे.

यूपीमध्ये एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांची आम्ही कोणत्याही परिस्थितीत सुटका करणार आहोत. सध्या भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू असून आतापर्यंत एक हजाराहून अधिक भारतीयांना देशात आणण्यात आले आहे. ऑपरेशन गंगाला चालना देण्यासाठी आम्ही चार केंद्रीय मंत्र्यांना तेथे पाठवले आहे. भारतीयांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत, असं मोदी म्हणाले.

पीएम मोदी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले की, भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आज जगातील परिस्थिती तुम्ही पाहत आहात. युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या देशातील नागरिकांची सुटका करण्यासाठी आपण एवढी मोठी मोहीम राबवत आहोत ही भारताची वाढती क्षमता आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील अनेक नागरिकांना देशात परत आणण्यात आले आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी भारताने आपले ४ मंत्रीही तेथे पाठवले आहेत. संकटात सापडलेल्या भारतीयांना लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपले लष्कर आणि हवाई दलही तैनात करण्यात आले आहे. सोनभद्रच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा मोठा फायदा झाला आहे. एकट्या सोनभद्र जिल्ह्यात २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ३५० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे.


हेही वाचा : Putin US Doomsday Plane: पुतिनकडून आण्विक हल्ल्याची धमकी, अमेरिकेचे हवाई दल सज्ज