घरताज्या घडामोडीPM Modi Security Breach: पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सुरक्षेतील हलगर्जीपणावर चर्चा

PM Modi Security Breach: पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सुरक्षेतील हलगर्जीपणावर चर्चा

Subscribe

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावरुन जाणार होता. याच मार्गावर शेतकरी आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. परंतु मोदींच्या ताफ्यासाठी मार्ग पोलिसांकडून रिकामा करण्यात आला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील सुरक्षेच्या हलगर्जीपणानंतर देशाचे राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यावर असलेल्या सुरक्षा त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशीही मोदींनी चर्चा केली आहे. त्यांनीही मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. मोदींच्या सुरक्षेत पंजाबमध्ये हलगर्जीपणा झाला असल्याचे समोर आले आहे. सुरक्षेच्या कारणावरुन देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून सुरक्षेच्या मुद्द्यावरच चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत.

- Advertisement -

राष्ट्रपती कोविंद यांनी सुरक्षेतील त्रुटी जाणून घेतल्या

राष्ट्रपती कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. “राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि काल पंजाबमधील त्यांच्या ताफ्यातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल विचारपूस केली. या गंभीर त्रुटीबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. असे मजकूरही लिहिला आहे.

- Advertisement -

मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावरुन जाणार होता. याच मार्गावर शेतकरी आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले होते. परंतु मोदींच्या ताफ्यासाठी मार्ग पोलिसांकडून रिकामा करण्यात आला नाही. यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे की, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली होती ते का झाले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यात मुख्य सचिव आणि डीजीपींसाठी गाडी राखीव ठेवण्यात आली होती. परंतु मुख्य सचिव आणि डीजीपीसारखे मोठे अधिकारी सहभागी नव्हते. जर एखाद्या राज्यात पंतप्रधान मोदी दौऱ्यासाठी जाणार असतील तर मोदींच्या स्वागतासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव उपस्थित राहतात. परंतु पंजाबमध्ये असे काही घडले नाही.


हेही वाचा : PM Modi Security: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, पंजाब दौऱ्यातील ३ धक्कादायक खुलासे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -