Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दलित, ओबीसी, महिला, शेतकऱ्यांची मुलं मंत्री झाल्याचे विरोधकांना पचनी पडलं नाही, मोदींचा...

दलित, ओबीसी, महिला, शेतकऱ्यांची मुलं मंत्री झाल्याचे विरोधकांना पचनी पडलं नाही, मोदींचा घणाघात

सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत अशी वर्तवणूक योग्य नाही - ओम बिर्ला

Related Story

- Advertisement -

संसदेच्या पावसाळी पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिली यावेळी विरोधकांनी एकच गोंधळा घातला होता. विरोधकांनी गदारोळ केल्यानं दलित, ओबीसी, महिला आणि शेतकऱ्यांचे मुलं मत्री झाले हे विरोधकांच्या पचनी पडलं नाही असे विधान नरेंद्र मोदी यांनी करुन विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. सभागृहात प्रचंड गोंधळ झाल्याने पिठासीन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काही काळ कामकाज स्थगित केलं होते.

सभागृहातील कामकाजाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिली. यावेळी मोदी म्हणाले की, सभागृहात असलेले आपले सहकारी खासदार जे शेतकरी कुटुंबातील आहेत, ग्रामीण भागातून पुढे आले आहेत, सामाजिक-आर्थिकद्रूष्ट्या मागासवर्गीय, ओबीसी समाजातील आहेत, त्यांना मोठ्या संख्येने मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे, त्यांचा परिचय करून देण्यात आनंद झाला असता, प्रत्येक बाकावरून, ते बाक वाजवून त्यांचा सन्मान करण्यात आला असता. पण कदाचित देशातील दलित मंत्री व्हावेत, देशातील महिला मंत्री व्हाव्यात, देशातील इतर मागासवर्गीय मंत्री व्हावेत, देशातील शेतकऱ्यांची मुले मंत्री व्हावीत, ही गोष्ट काही लोकांना पसंत पडली नसावी आणि म्हणून ते त्यांचा परिचय देखील होऊन देत नाहीत. अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली आहे.

- Advertisement -

लोकसभा अध्यक्षांचा विरोधकांची विरोधकांना तंबी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांची ओळख करुन देताना सभागृहात विरोधकांनी गदारोळ निर्माण केला. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना असं वागणं हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत अशी वर्तवणूक योग्य नाही. चांगल्या पंरपरा मोडीत काढल्या जात आहेत. असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांनी घातलेल्या गोंधळावर निशाणा साधत म्हणाले.

- Advertisement -