Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी कधी रेल्वे स्टेशन तर कधी थिएटर आणि शाळा...पंतप्रधान मोदींचा असा आहे आयुष्याचा...

कधी रेल्वे स्टेशन तर कधी थिएटर आणि शाळा…पंतप्रधान मोदींचा असा आहे आयुष्याचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात गुजरातमधील वडनगर रेल्वे स्टेशनला विशेष महत्व आहे.

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यात गुजरातमधील वडनगर रेल्वे स्टेशनला विशेष महत्व आहे. कारण हे तेच रेल्वे स्टेशन आहे ज्या ठिकाणी लहानपणी मोदी ट्रेनमध्ये चहा विकायचे. आज पुन्हा हे स्टेशन चर्चेत आलं आहे. कारण मोदी आज याच स्टेशनचं डिजिटल उद्घाटन करत आहेत. आजच्या तारखेला या रेल्वेस्टेशनचा पूर्ण कायापालट झाला असून त्याला हेरिटेज लुक देण्यात आला आहे. याचनिमित्ताने मोदींच्या लहानपणाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत विकायचे चहा

- Advertisement -

नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० साली गुजरातमधील वडनगर येथे झाला. सहा भावंडांमध्ये मोदी तिसरे होते. त्यांचे वडील वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. शाळा सुटल्यानंतर मोदीही वडिलांना मदत म्हणून स्टेशनवर चहा विकायला जायचे.स्टेशनवर ट्रेन थांबताच ते डब्यात जाऊन चहा विकायचे.

- Advertisement -

एका मुलाखतीत मोदी यांनी याचसंदर्भात एक किस्साही सांगितला होता. ट्रेनमध्ये चहा विकताना अनेकजण त्यांना ओरडायचे तर काहीप्रवासी प्रेमाने बोलायचे. तर कधी कधी ट्रेनमधून मुंबईचे व्यापारी यायचे. मोदींकडून ते चहा घ्यायचे आणि गप्पाही मारायचे. त्यांच्याशी बोलतच आपण हिंदी शिकलो असेही मोदींनी सांगितले होते.

तसेच मोदी चित्रपटाचे शौकीन होते. पण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्याएवढे पैसे त्यांच्याकडे नसायचे. यामुळे थिएटर बाहेर चने विकणाऱ्या मित्राच्या वडिलांबरोबर ते कधी तरी चित्रपट बघायला जायचे.

 

- Advertisement -