Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Covid-19 vaccine: मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात चर्चा; भारतात येण्याचे...

Covid-19 vaccine: मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात चर्चा; भारतात येण्याचे दिले निमंत्रण

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यात गुरुवारी फोनवर संभाषण झाले. असे सांगितले जात आहे की, कोरोना लसीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कमला हॅरिस यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना हा फोन करण्यात आल्याचा दावा वृत्तसंस्था एएनआय कडून करण्यात आला आहे. कोरोना लसबाबत  भारत-अमेरिका भागीदारीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून असे म्हटले की, अमेरिकेच्या जागतिक कोरोना लस वाटणीच्या रणनीतीनुसार लस पुरवण्याच्या आश्वासनाचे मी मनापासून कौतुक करतो. भारत-अमेरिका कोरोना लसीच्या सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर आम्ही चर्चा केली.

- Advertisement -

जगातील आरोग्य स्थिती सामान्य झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अमेरिकेचे उपराष्ट्रपती हॅरिस यांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. अमेरिका आणि भारतसह कोरोना लस उत्पादनाच्या क्षेत्रात आरोग्य बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. त्यांनी भारत-अमेरिका भागीदारीची संभाव्यता तसेच महामारीच्या दीर्घकालीन आरोग्यासह कोरोना लस उपक्रमावरही संवाद साधला.

अमेरिकेच्या दौर्‍याच्या शेवटी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले असे की, कोरोनासंदर्भात अनेक आघाड्यांवर दोन्ही देशांमधील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल. अमेरिकन पक्षांनीही हे स्पष्ट केले की कोरोनाग्रस्त भारताला मदत करण्यासाठी त्यांच्याकडून पुढचे प्रयत्न सुरू राहणार असून आतापर्यंत अमेरिकेकडून भारताला ५०० कोटी डॉलर्सची मदत मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी असेही म्हटले की, अमेरिकेच्या मदतीने भारतातील लस उत्पादनाच्या कामास गती द्यावी. भारत लस उत्पादनाच्या संदर्भात थेट अमेरिकेशी संवाद साधत आहे आणि दुसर्‍या देशामध्येही क्वाड अंतर्गत उत्पादन करण्याबाबत स्वतंत्रपणे चर्चा सुरू आहे.


- Advertisement -

 

 

- Advertisement -