PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून (Red Fort) देशाला संबोधित (Speech) केले. यावेळी त्यांनी देशाला संबोधित करताना त्यांचे निवडक शब्द जे ते गेली नऊ वर्षे स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देश ऐकत होता, त्यात बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात यावेळी ‘बंधू आणि भगिनी’ आणि ‘माझ्या प्रिय देशवासियां’ऐवजी ‘कुटुंबातील सदस्यांचा’ उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या ‘कुटुंबातील सदस्य’ या उल्लेखामागे अनेक सामाजिक आणि राजकीय अर्थ काढले जात आहेत. पंतप्रधान मोदींच्या ‘कम्युनिकेशन स्किल्स’सह त्यांच्या भाषणांवर संशोधन करणार्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे करून मोदींनी आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काँग्रेसकडून (Congress) ‘कुटुंब’ या शब्दावरच आक्षेप घेण्यात आला आहे. (PM Modi Speech Modis speech from Red Fort But Congress objected to the word family)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या दीड तासाच्या भाषणादरम्यान ‘कुटुंब’ शब्दाचा वापर केला आणि याच शब्दावरून आता राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड तासाच्या भाषणात केवळ राजकीय स्वार्थासाठी ‘कुटुंब’ शब्दाचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – PM Modi Speech : “75 वर्षांत काही विकृती…” पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा
अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित होते. संपूर्ण देशातील जनता त्यांचे कुटुंब आहे. मोदी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक घराला एक कुटुंब मानतात, असे अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, काही लोकांसाठी देशातील मतदार राक्षस असू शकतात परंतु आमच्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक आणि घर हे माझे स्वतःचे घर आणि माझे कुटुंब आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणावर राजकीय विश्लेषकांनीही आपले मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदींचे भाषण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून केलेले भाषण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाचे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजकीय विश्लेषक सत्यपाल पुंडीर म्हणतात की, पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने या भाषणात शब्द वापरले ते आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडलेले एकप्रकारे कथन होते. सत्यपाल पुंडिर यांनी विश्वास व्यक्त करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बंधू, भगिनी आणि माझ्या प्रिय देशबांधवां’ऐवजी, ‘कुटुंबातील सदस्यांचा’ उल्लेख करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा – PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा, म्हणाले…
‘कुटुंब’ हा भारतीय परंपरेतील सर्वात मजबूत धागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ‘कुटुंबातील सदस्यांचा’ या शब्दाचा दोन डझनहून अधिक वेळा उल्लेख केला आणि तज्ज्ञ व विरोधकांना या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची संधी दिली. वर्धास्थित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील भाषा आणि संवादाचे प्राध्यापक जगदीश नारायण यांनी सांगितले की, ज्या शब्दांमध्ये लोकांना अधिकाधिक जोडण्याची क्षमता असते, ते शब्दाचा वापर केवळ राजकारणातच नाही तर सामान्य भाषेतही वापरले जातात.
‘कुटुंबीय’ शब्दामुळे होणारा मोठा परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात ‘कुटुंबीयांचा’ या शब्दाचा वारंवार उल्लेख करून देशातील अधिकाधिक लोकांशी ‘जवळीक’ साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कुटुंब या शब्दाकडे अजूनही भारतीय परंपरेतील सर्वात मजबूत धागा म्हणून पाहिले जाते, असे जगदीश नारायण यांचे मत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने देशातील जनतेला, विशेषत: गरीब वर्गाला आपले ‘कुटुंबीय’ असे संबोधल्याने त्याचा मोठा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो, असेही जगदीश नारायण म्हणाले.
हेही वाचा – PM Modi : देशातील महिलांचे मोदींने केले कौतुक, सांगितला परदेशातील ‘तो’ प्रसंग
पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर विद्यार्थ्यांनी केले संशोधन
प्राध्यापक जगदीश नारायण सांगतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषाशैली आणि त्यांच्या भाषणात नेहमीच दुतर्फा संवाद राहिला आहे. त्यामुळे माझ्या विभागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि त्यांच्या संवादाच्या पद्धतींवरही अनेक प्रकारचे संशोधन केले आहे. विद्यार्थ्यांना संशोधनादरम्यान नरेंद्र मोदी यांची गेल्या अनेक वर्षांतील भाषणांची नोंद करून त्यावर सखोल संशोधन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात केवळ दुतर्फा संवादालाच महत्त्व देत नाहीत तर ते नेहमी थेट जनतेशी जोडणारे शब्द वापरतात.
‘कुटुंब’ शब्द भारतीय परंपरेतील सहवासाचे एक मजबूत माध्यम
“सेंटर फॉर लिंग्विस्टिक्स अँड इट्स इम्पॅक्ट”चे राष्ट्रीय संयोजक जेपी लोढा म्हणतात की, भाषा आणि देहबोलीद्वारे तुम्ही लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच या प्रकारे वेगवेगळ्या व्यासपीठांवरून लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ‘कुटुंब’ हा शब्द भारतीय परंपरेतील सहवासाचे एक मजबूत माध्यम आहे, ज्यामध्ये लोकांना केवळ आपलेपणाची भावनाच येत नाही तर, लोक थेट जोडले जातात.