नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करण्याची परंपरा असून, याला खूप मोठा इतिहास आहे. अशातच यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील स्वातंत्र्यदिनाचे शेवटचे संबोधन करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या संबोधनातून विविध घोषणा केल्या असून, आता ते आपल्या दहाव्या संबोधनात कोणती महत्वाची घोषणा करतात याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे. (PM Modi Speech Prime Ministers Tuesday Address Attention of Countrymen; What will be announced this time?)
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करणार आहेत. यासोबतच ते संबोधनाआधी लाल किल्यावर ध्वजारोहण करणार आहेत. स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याची ही त्यांची दहावी वेळ असणार आहे. ध्वजारोहणानंतर ते देशवासीयांना संबोधन करणार आहे. मात्र, यावेळी ते देशवासीयांना कोणता संदेश देणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : तिरंगा साडी… हिंदुस्थान झिंदाबादचे नारे; पाकिस्तानच्या सीमा हैदरने फडकावला भारतीय ध्वज
आतापर्यंत दहा वेळा तीन पंतप्रधानानी केले ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर दहा वेळा ध्वजारोहण करण्यामध्ये आतापर्यंत तीन पंतप्रधानांचा समावेश आहे. त्यामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि मनमोहनसिंह या तीन पंतप्रधानांनी त्यांचा दोन टर्मचा पंतप्रधानाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत समाविष्ट झाले आहेत. ते यंदाचा त्यांचा दहावा ध्वजारोहण करणार आहेत.
हेही वाचा : राम मंदिरातील कर्मचाऱ्यांना मिळणार ‘या’ सुविधा; भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नाही
पंतप्रधानाच्या घोषणेकडे लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरुन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे त्यांचे शेवटचे भाषण असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते कुठली महत्त्वाची घोषणा करतात याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
सर्वाधिक वेळ भाषण करण्यामध्ये मोदीच अव्वल
लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करण्याची परंपरा असून, यावेळी पंतप्रधान देशवासीयांना संदेश देत असतात. यामध्ये कोणत्या पंतप्रधानानी कितीवेळ भाषण दिले याचाही एक वेगळा इतिहास आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळ (तास) कुणी भाषण केले हे पाहले तर सर्वाधिक वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक वेळ म्हणजेच 2016 मध्ये सर्वाधित 94 मिनिटं भाषण केले होते. तर सर्वात कमी वेळ माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे 2012 मधील 32 मिनिटांच्या भाषणाचा समावेश आहे. तर उद्या स्वातंत्र्याच्या अमृतकाल महोत्सवाचा शेवट होत असल्याने आणि निवडणुकांच्या आधीच्या वर्षातले भाषण असल्याने मोदी काय बोलतात याची उत्सुकता असेल.