…आणि पत्रकारांच्या गराड्यात अडकलेल्या मोदींची उडाली तारांबळ

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रकारांनी घेरले असून कुठल्याही प्रश्नाची उत्तरे न देता ते तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावरून नेटकरी मोंदींवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आणि युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. लाईफ विदाऊट टेलीप्रॉम्पटर (Life without a Teleprompter!!)” अशी कॅप्शन याला  देण्यात आली आहे.

जनसत्ता या वेबसाईटने ही बातमी दिली असून या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर कमेंट्स देत आहेत. परदेश दौऱ्यात मोदी जे काही बोलतात ते आधीच स्क्रिप्टेड असते. यामुळे जे लिहलेले असते तेवढेच ते बोलतात. पण जेव्हा त्यांच्याजवळ स्क्रिप्ट नसते तेव्हा तिथे ते फसतात. असे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींना भारतीय नागरिक आणि परदेशी वृत्तवाहीन्यांच्या पत्रकारांनी घेरल्याचे दिसत आहे. यामुळे तारांबळ उडालेले मोदी या गर्दीतून बाहेर पडण्याची घाई करताना दिसत आहे.