घरदिवाळी 2023पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा सीमेवर साजरी करणार दिवाळी: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना भेटणार

पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा सीमेवर साजरी करणार दिवाळी: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना भेटणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी 12 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील जोरियन येथे 191 ब्रिगेडसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

जम्मू-काश्मीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी 12 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील जोरियन येथे 191 ब्रिगेडसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. (PM Modi to celebrate Diwali on the border for the 10th time in a row Meet soldiers in Jammu and Kashmir)

2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधान मोदी दरवर्षी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. 2022 मध्ये मोदींनी कारगिलमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

- Advertisement -

आज दिवाळीनिमित्त पंतप्रधानांनी ट्वीटर म्हणजेच X मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.

अखूनर येथील झोरियन भागात लावणार हजेरी

जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील झोरियन येथे भारतीय लष्कराच्या 191 ब्रिगेडसोबत दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान बीएसएफ जवानांसोबतही दिवाळी साजरी करणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी ज्योदिया येथील राख मुठी भागात लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी मिठाई खाण्याचा आनंद घेणार आहेत. दुपारी दिल्लीला परतण्यापूर्वी पंतप्रधान लष्करी परिषदेला संबोधितही करतली. पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी दरवर्षी आंतराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. यंदाही त्यांनी हे कायम ठेवलं आहे.

2022 मध्ये कारगिलमध्ये सैनिकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते – भारत नेहमीच शांततेसाठी उभा राहिला आहे. आम्ही नेहमीच युद्ध हा पहिला नाहगी तर शेवटचा उपाय नाही, पण देशावर वाईट नजर ठेवणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद आणि रणनीती आमच्या सशस्त्र दलांमध्ये आहे.

शनिवारी 11 नोव्हेंबरला अयोध्यानगरी राममय झाली. 7 व्या दीपोत्सवानिमित्त सरयू नदीच्या काठावरील 51 घाटांवर 24 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. 22 लाख 23 हजार दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला. होलोग्राफिक प्रकाशाद्वारे महर्षी वाल्मिकी यांनी रामाची कथा सांगितली. लेझर शोनंतर 23 मिनिटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 84 लाख रुपयांचे ग्रीन फटाके पेटवण्यात आले.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणा दरम्यान ‘ती’ चढली खांबावर; तेलंगणातील सभेमधील प्रकार )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -