देशात कोरोना रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने वाढ; पंतप्रधान मोदींनी आज तातडीने बोलावली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली होणाऱ्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

v prime ministers awards for excellence in public administration
PM Awards : PMO ने योजना सुधारणांना दिली मंजुरी; 'या' चार योजनांवर सरकारचे लक्ष

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख ५९ हजार ६३२ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. तर देशातील २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉन पसरला असून ३ हजार ६२३ ओमिक्रॉन रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यामुळे देशातील या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक बोलावली आहे.

देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या स्थितीचा आढावा घेण्याठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बैठक पार पडणार आहेत. आज दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली बैठक होणार आहे. वेगवेगळ्या विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी या बैठकीला सहभागी असतील. त्यामुळे या बैठकीनंतर केंद्र पातळीवर कोण-कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सध्या सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा – Coronavirus Cases Today: कोरोनाचा कहर! देशात २४ तासांत दीड लाख नवे रुग्ण, २७ राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन 

सध्या देशातील काही राज्यांमध्ये कोरोना फोफावला आहे. त्यामुळे अशा राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहे. काल, शनिवारी महाराष्ट्र सरकारने निर्बंध जाहीर केले. उद्यापासून, सोमवारी महाराष्ट्रात हे कडक निर्बंध लागू होणार आहेत. उद्यापासून महाराष्ट्रात सकाळी ५ ते रात्री ११ जमावबंदी आणि रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, हरयाणा, दिल्ली, तामिळनाडू अशा अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. दिल्लीची सध्या मुंबईप्रमाणे परिस्थिती होताना दिसत आहे. दिल्लीत शनिवारी दिल्लीत २० हजार १८१ नवे कोरोनाबाधित आढळले, जे गेल्या आठ महिन्यातील सर्वाधिक जास्त रुग्ण आहेत. यापूर्वी ५ मे रोजी २० हजार ९६० कोरोना रुग्णांची नोंद झाली होते. राजधानी दिल्लीतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १६ हजार ९७९वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या २५ हजार १४३ झाली आहे.


हेही वाचा – Delhi Corona Blast: संसद भवनात कोरोनाचा विस्फोट; ४००हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह