Omicron Variant: ओमिक्रॉनच्या रुग्णांचा वाढता आलेख, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीकडे लक्ष

PM Modi To Hold Council Of Ministers Meeting Today for omicron and upcoming assembly elections
Omicron Variant: ओमिक्रॉनच्या रूग्णांचा वाढता आलेख, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीकडे लक्ष

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या केसेस दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळासोबत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. मंत्रिमंडळासोबतची मोदींची ही बैठक आज संध्याकाळी ४ वाजता होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, या महत्त्वाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी येत्या वर्षभरात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करतील आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेसचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा तीन पट जास्त संसर्गजन्य असणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटसोबत सामना करण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचला आणि जिल्हा आणि तहसील स्तरावरही सतर्कता बाळगा, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

देशात गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनच्या केसेसप्रमाणे कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी देशात ६ हजार ३५८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ६ हजार ४५० जण रिकव्हर झाले आहे. सध्या देशातील रिकव्हरी रेट ९८.४० टक्के आहे. तर दुसऱ्या बाजूला देशातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या ६००पार झाली आहे. २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनने आपले पाय पसरले आहेत. देशात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन राज्यांमध्ये आहे.


हेही वाचा – Covid booster dose: ज्येष्ठ नागरिकांच्या ‘बूस्टर’साठी डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शन गरजेचे? केंद्राने दिले स्पष्टीकरण