घरताज्या घडामोडीPMGKAY: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार, मोदींची घोषणा

PMGKAY: पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार, मोदींची घोषणा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज गुजरातच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनाच्या लाभार्थ्यांसोबत बातचित केली. यावेळी मोदी म्हणाले की, प्रत्येक मार्गाने मदत करणे हे आमचे ध्येय आहे. या योजनाबाबत जागरुकता परसवण्यासाठी गुजरातमध्ये जन सहयोग कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलोग्राम अतिरिक्त राशन उपलब्ध केलं जात आहे. दरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिसीद्वारे केली.

या व्हिसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज २ रुपये किलो गहू, ३ रुपये किलो तांदूळ, तसेच ५ किलो गहू आणि तांदुळ प्रत्येक लाभार्थ्यांना दिले जात आहे. म्हणजेच या योजनेत पहिल्यापेक्षा राशन कार्ड असलेल्यांना जवळपास दुप्पट राशन उपलब्ध करून दिले जात आहे. आता गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे. जगभरात या योजनेचे कौतुक केले जात आहे. मोठं-मोठे तज्ज्ञ या योजनेचे कौतुक करत आहेत की, भारत आपल्या ८० कोटींहून अधिक लोकांना महामारी दरम्यान मोफत धान्य उपलब्ध करत आहेत.’

- Advertisement -

पुढे मोदी म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारने गरिबांना स्वस्त जेवण देण्याबाबत सांगितले होते. स्वस्त राशन योजना विस्तार आणि बजेट प्रत्येक वर्षी वाढत गेले. परंतु त्याचा प्रभाव झाला पाहिजे होता, तो मर्यादित राहिला. सध्या सरकार नागरिकांना प्रत्येक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवत आहेत. आता कुटुंबांची राशन समस्या कमी होत आहे.’

- Advertisement -

‘यावर्षी भारतातील बऱ्याच खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये क्वालीफाई केले. काही असे खेळ आहेत, ज्यामध्ये आपल्याला पहिल्यांदाच क्वालीफाई केले आहे. फक्त क्वालीफाई केले नाही तर चांगलीच टक्कर पण देत आहे,’ असे मोदी म्हणाले.


हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १०१ पत्रकारांच्या कुटुंबीयांना केंद्राकडून आर्थिक मदत


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -