घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक; देशातील ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेणार

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक; देशातील ऑक्सिजन साठ्याचा आढावा घेणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी ऑक्सिजनचा सध्या साठा आणि त्याच्या वाढीबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत बैठकीत विचार केला जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.३० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवड्यासह रुग्णालय आणि मेडिकलमध्ये आरोग्य संबंधित उपकरणांची कमतरता जाणवली. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे. यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, एका छोट्याशा चुकीमुळे मोठे परिणाम होऊ शकतात आणि महामारीसोबत सुरू असलेली लढाई कमकुवत होऊ शकते.

पंतप्रधान मोदींनी २६ जूनला देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल आणि कोरोना संसर्गाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लसीकरण मोहिमेच्या गतीबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले. एप्रिल महिन्याच्या शेवट्याच्या दोन आठवड्यात आणि मे महिन्याच्या सुरुवातीला मेडिकल ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ४३ हजार ३९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४४ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ७ हजार ५२ हजार ९५०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५ हजार ९३९ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -