घरताज्या घडामोडीदेशात कोरोनाचा कहर थांबेना! PM Modiनी सात राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिली 'ही' सूचना

देशात कोरोनाचा कहर थांबेना! PM Modiनी सात राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिली ‘ही’ सूचना

Subscribe

देशात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सात राज्यातील कोरोना परिस्थितीचा व्हर्च्युअल मिटिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. या मिटिंगमध्ये सात राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उपस्थित होते. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित संख्या आणि मृत्यू या सात राज्यात आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाबमध्ये या राज्यांच्या समावेश आहे. या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी चाचण्याची संख्या वाढण्यापासून रुग्णालयांमध्ये चांगल्या व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळेस मुख्यमंत्र्यांना सूचना दिली.

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशात ७०० हून अधिक जिल्हे आहेत, परंतु कोरोनाची जी वाढती संख्या आहे ती फक्त ६० जिल्ह्यांमध्ये आहे, ते पण सात राज्यात आहे.’ यावेळी मोदींनी मुख्यमंत्र्यांना अशी सूचना दिली की, ‘एक सात दिवसांचा कार्यक्रम तयार करा आणि दररोज एक तास द्या. दररोज व्हर्च्युअल पद्धतीने एका जिल्ह्यात एक ते दोन ब्लॉकमधील लोकांशी थेट संवाद साधा. या कोरोनाच्या काळात देशाने संयम, संवेदना, संवाद आणि सहकार्याचे प्रदर्शन दाखवले, हे आपल्याला पुढे सुरू ठेवावे लागणार आहे. व्हायरसच्या विरोधातील लढ्यासोबत आपल्याला आर्थिक आघाडीवर पूर्ण ताकदीने पुढे जावे लागेल.’

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या सात राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला, या राज्यांमध्ये देशातील ६३ टक्के Active केसेस आहेत. देशात आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ६५.५ टक्के आणि मृत्यूंपैकी ७७ टक्के मृत्यू या राज्यात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये गेल्या एका आठवड्यातील दररोज सरासरी तुलनेत नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु पंजाब आणि दिल्लीमध्ये हे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये मृत्यूच्या प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण आहे. जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा १.६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या सात राज्यांमध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेश वगळता पॉझिटिव्ह दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.


हेही वाचा – सीरम इन्स्टिट्यूटने आणखी एका लसीवर केले काम सुरू, नाकावाटे दिला जाणार डोस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -