अमरनाथ ढगफुटी घटनेवर पीएम मोदींनी ट्विट करत व्यक्त केला शोक

अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीच्या घटनेत दहा भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथे ढगफुटी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदींनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

अमरनाथ गुहेजवळ ढग फुटची घटना घडल्यानं मी व्यथीत झालो आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या शोकग्रस्त कुटुंबियांप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. या दुर्घटनेबाबत मदतकार्य वेगानं व्हावं याबाबत मी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी बोललो आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे, असं ट्विट पीएम मोदींनी केलं आहे.

ही दुर्घटना संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर उंचावरील भागातून वाहत आलेला पाण्याचा लोंढा हा अमरनाथ गुहेजवळून वाहत आहे. डोंगरातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहानं भाविकांचे २५ टेंट आणि काही दुकाने वाहून गेल्याची माहिती आहे. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच या ठिकाणी NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनी मदतकार्यास सुरूवात केली आहे.


हेही वाचा : अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटी, 10 यात्रेकरुंचा मृत्यू, अनेक जखमी, रेस्क्यू ऑपरेशन सुरू