Homeदेश-विदेशPM Modi Podcast : दैवी शक्तीपासून ते मी माणूस आहे...देव नाही... पहिल्याच...

PM Modi Podcast : दैवी शक्तीपासून ते मी माणूस आहे…देव नाही… पहिल्याच पॉडकास्टमध्ये काय म्हणाले पंतप्रधान

Subscribe

झिरोदाचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध पॉडकास्ट ‘पीपल बाय WTF’ चे सूत्रसंचालक निखिल कामथ हे सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पॉडकास्टचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा ट्रेलर स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील शेअर केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच पॉडकास्टचे ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. झिरोदाचे सहसंस्थापक आणि व्यावसायिक निखिल कामथ यांनी हे पॉडकास्ट केले आहे. (pm modi upcoming podcast with nikhil kamath says i am human not god watch trailer)

झिरोदाचे सहसंस्थापक आणि प्रसिद्ध पॉडकास्ट ‘पीपल बाय WTF’ चे सूत्रसंचालक निखिल कामथ हे सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या पॉडकास्टचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा ट्रेलर स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Who is Nikhil Kamath : पंतप्रधान मोदींसोबतच्या पॉडकास्टमुळे चर्चेत आलेले निखिल कामथ कोण?

या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी आपला व्यक्तिगत राजकीय प्रवास सांगितला. मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेल्या एका भाषणाची देखील त्यांनी आठवण काढली. या भाषणात आपल्याकडून एक चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. चुका होतात…मी माणूस आहे…देव नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

यावेळी लोकसभेपूर्वी झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीची आठवण झाली. एवढी ऊर्जा तुम्ही कुठून आणता, असा प्रश्न त्यांना निवडणुकीपूर्वी विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून तेव्हा खूप टीका झाली होती.

हेही वाचा – PM Modi : मी त्याकडे…; पहिल्या पॉडकास्टमध्ये मेलोडी मिम्सवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

देवानेच मला पाठवलं आहे. कारण, माझ्यामधील शक्ती ही साधारण नाही ती देवानेच मला दिलीये असं वाटतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाले की, ‘माझी आई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत मला वाटायचं मी तिच्या पोटीच जन्म घेतलाय. पण, तिच्या निधनानंतर, मला विश्वास वाटायला लागला की माझ्यातील शक्ती ही साधारण नाही. देवानेच खास शक्ती देऊन मला पाठवलं आहे. माझ्याकडून काही तरी करून घेण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या पॉडकास्टचा ट्रेलर पाहताना अनेकांना याचीच आठवण झाली.

या पॉडकास्टचा ट्रेलर पंतप्रधान मोदींनी देखील शेअर केला आहे. हे पॉडकास्ट करताना मला खूप आनंद झाला, तुम्हालाही एवढाच आनंद होईल, असे मला वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -