घरताज्या घडामोडीMan Ki Baat : पंतप्रधान व्यक्त करणार जनतेच 'मन', देशवासियांकडून मागविल्या सूचना

Man Ki Baat : पंतप्रधान व्यक्त करणार जनतेच ‘मन’, देशवासियांकडून मागविल्या सूचना

Subscribe

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘मन की बात’द्वारे (Mann Ki Baat) देशवासियांशी संवाद साधत असतात. आता ‘मन की बात’चा पुढील एपिसोड या महिन्यांच्या शेवटच्या रविवारी अर्थात २६ सप्टेंबरला होणार आहे. यासाठी देशवासियांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना मागवल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट केलं आहे. कारण लोकांच्या चांगल्या सूचनांच्या आधावर देशाच्या योजना पुढे नेणे हे त्यांचे ध्येय आहे.

‘मन की बात’च्या ८१व्या मालिकेसाठी देशवासियांनी त्यांचे विचार सांगा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. याचे प्रसारण रविवारी २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. ‘मन की बात’साठी आपले विचार नमो App आणि Mygov Appवर पाठवायचे आहे. शिवाय टेलिफोन नंबर १८००-११-७८०० वर देशवासीय संदेश रेकॉर्ड करून पाठवू शकतात. यासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी २९ ऑगस्टला आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या ८०व्या मालिकेत देशवासियांना संबोधित करताना मोदींनी बिहारमधल्या एका कृषी विज्ञान केंद्र आणि तामिळनाडूमधील कांजीरांगल पंचायत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.

- Advertisement -

‘मन की बात’ हा कार्यक्रम पहिल्यांदा ३ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रसारित झाला होता. जानेवारी २०१५ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत मोदी या कार्यक्रमात उपस्थितीत होते. या कार्यक्रमात देशवासियांकडून आलेल्या पत्राचे उत्तर त्यांनी दिले होते.


हेही वाचा – चांगले रस्ते हवे असतील, तर पैसे द्यावेच लागतील


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -