‘हर घर तिरंगा चळवळ’ मजबूत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन; जाणून घ्या 22 जुलैचीच निवड का?

prime minister narendra modi praised vice president venkaiah naidu in parliment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा चळवळीला अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले की, यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रत्येक घरात तिरंगा चळवळ मजबूत करुया.13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने तिरंगा फडकवावा किंवा आपल्या घरात तिरंगा लावावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजासोबत असलेले आपले संबंध अधिक दृढ होतील.

इतिहासात 22 जुलैचे विशेष महत्त्व

दुसऱ्या एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, आज 22 जुलैला आपल्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. 1947 मध्ये याच दिवशी आपण भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला होता.

स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या महान व्यक्तींचे स्मरण ठेवा – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपण वसाहतवादाशी लढा देत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व श्रेष्ठ आणि धैर्याने प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक जण आज आम्हाला आठवत आहेत. त्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांतील भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर कोणताही कर नाही

केंद्र सरकारने पॉलिस्टरपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर वस्तू आणि सेवा करात सूट दिली आहे. कापूस, रेशीम, लोकर किंवा खादीपासून बनवलेल्या हाताने विणलेल्या राष्ट्रध्वजांना आधीच अशा करातून सूट देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर 2021 मध्ये केलेल्या सुधारणांसह ध्वज संहिता 2002 चे अनुसरण करणार्‍या भारतीय राष्ट्रध्वजांना GST मधून सूट दिली जाईल.


हेही वाचा : सतत इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीमुळे उत्पादकांना नोटीस, लवकरच कारवाई होणार, नितीन गडकरींचे आश्वासन