घरदेश-विदेशPM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेतील ज्वाइंट बेस एंड्रयूजमध्ये दाखल, भारतीयांकडून...

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेतील ज्वाइंट बेस एंड्रयूजमध्ये दाखल, भारतीयांकडून जंगी स्वागत

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वॉशिंग्टनमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारीपासून (२२ सप्टेंबर) तीन दिवशीय अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये पोहचले आहे. आज पहाटे ३.४० वाजता वॉशिंग्टनला पोहोचले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानातून वॉशिंग्टन डीसीमधील जॉइंट बेस एंड्रयूज येथे उतरले, तेव्हा तेथील भारतीयांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींना भेटण्यासाठी देखील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी वॉशिंग्टनमधील भारतीयांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहेत. यामुळे पीएम मोदी वॉशिंग्टन डीसीला पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. विशेष म्हणजे यावेळी मोदींनाही सर्वांना भेट हेत हस्ताआंदोनल केले. सध्या सोशल मीडियावरही पंतप्रधान मोदी लोकांना भेटताना आणि हस्तांदोलन करताना दिसले.

- Advertisement -

अनेक बड्या नेत्यांची घेणार भेट

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेणार आहेत. मोदी आणि बायडेन यांच्यात २४ सप्टेंबरला द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत भारत- अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात तसेच जागतिक समस्यांवर चर्चा करतील. पंतप्रधान मोदी ५ दिवसांच्या म्हणजेच २२ ते २७ असा अमेरिका दौरा आहे.

- Advertisement -

UNGA ला करणार संबोधित 

पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करत आपल्या दौऱ्याची सांगता करतील. ज्यामध्ये ते कोरोना महामारी, दहशतवाद समस्या, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या समस्यांसह जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करतील. कोरोनाच्या काळात मोदींची ही दुसरी परदेश यात्रा आहे, त्यापूर्वी त्यांनी मार्चमध्ये बांग्लादेशला भेट दिली होती.



पंतप्रधान मोदींचा पाच दिवसीय अमेरिका दौरा आजपासून, बायडन भेटीसह अफगाणिस्तान मुद्द्यावर चर्चेची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -