घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमेवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमेवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सीमेवर जाऊन नियंत्रण रेषेवरील पहारेकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. संविधानातील अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर मोदी पहिल्यांदाच काश्मिरमध्ये आले. यावेळी पंतप्रधानांनी शहरातील बी.जी.ब्रिगेडमधील सैनिकांशी संवाद साधला. “पंतप्रधान स्वतः सीमेवर येऊन आमच्यासोबत दिवाळी साजरी करतील, असे आम्हाला वाटलं नव्हतं. त्यांनी आमची ही दिवाळी संस्मरणीय केली आहे”, अशी प्रतिक्रिया काही सैनिकांनी दिली.

यावेळी सैनिकांशी गप्पा मारताना मोदी म्हणाले की, “आपल्या परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे मी देखील माझ्या परिवारासोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीच मी इथे आलो आहे.”

- Advertisement -

 

- Advertisement -

पंतप्रधान मोदी भेट देऊन गेल्यानंतर काही सैनिकांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले की, “आम्ही सीमेवर २४ तास देशाच्या रक्षणासाठी सतर्क असतो. पंतप्रधान स्वतः भेट द्यायला आल्यामुळे आमच्यातला आत्मविश्वास वाढला आहे. मोदींनी आमच्या कामाची प्रशंसा केली. तसेच सरकार सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी आम्हाला सांगितले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -