घरक्रीडापंतप्रधान मोदींनी क्रिकेट मैदानावर जाऊन कर्णधार रोहित शर्माला घातली विशेष टोपी

पंतप्रधान मोदींनी क्रिकेट मैदानावर जाऊन कर्णधार रोहित शर्माला घातली विशेष टोपी

Subscribe

आज (ता. ०९ मार्च) अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना खेळला जात आहे. परंतु या सामन्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह हजेरी लावून सर्व खेळाडूंना सुखद दिला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला विशेष टोपी देखील दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेट हा खेळ आवडतो, हे सर्वांनाच माहित आहे आणि त्याचमुळे की काय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्याच्याआधीच आज (ता. ०९ मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट क्रिकेटच्या मैदानावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा क्रिकेट सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळला जात आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या चौथ्या कसोटी सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. पण त्याआधीच दोन्ही देशाचे पंतप्रधान खेळाच्या मैदानावर पोहोचल्याने सर्व खेळाडूंसह सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांना सुद्धा सुखद धक्का मिळाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला विशेष टोपी दिली. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सुद्धा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला सुद्धा विशेष टोपी दिली.

- Advertisement -

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज हे चार दिवसांसाठीच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कसोटी सामन्याला उपस्थित राहणार असल्याचे आधीच ठरले होते. पंतप्रधान मोदी व अल्बानीज हे दोन कर्णधारांसोबत नाणेफेक करतील अशी माहिती समोर आली होती. मात्र, प्रत्यक्षात वेगळंच चित्र आज पाहायला मिळाले. नाणेफेक करण्याच्या आधी नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज मैदानात फिरून प्रेक्षकांचे स्वागत करताना दिसले. राष्ट्रगीतासाठी देखील दोन्ही पंतप्रधान संघांसोबत उभे असल्याचे पाहायला मिळाले. महत्वाचे म्हणजे यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी हा क्षण संस्मरणीय ठरला. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंटला या क्षणाचे फोटो पोस्ट केले आहेत.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघामध्ये कोणताही बदल न करता हा संघ खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे, तर रोहित शर्माने अंतिम ११ खेळाडूंमध्ये एक महत्वाचा बदल केला आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -