घरताज्या घडामोडी१७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संयुक्त राष्ट्रात संबोधन!

१७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संयुक्त राष्ट्रात संबोधन!

Subscribe

संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलैला संयुक्त राष्ट्रात महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील विजयानंतर पंतप्रधानांचं हे पहिलचं भाषण असेल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

या सुरक्षा परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम. फ्रान्स, रशिया आणि चीन हे स्थायी सदस्य आहेत. यावर्षी भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली होती. १९५०-५१, १९६७-६८, १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२ मध्ये भारताची अस्थायी सदस्य म्हणून निव़ड झाली होती.

- Advertisement -

या आधी केलेल्या नरेंद्र मोदी म्हणाले होते की, संयुक्त राष्ट्रासारखी संघटना असतानाही अनेक जी समूह तयार झाले आहेत. भारत अशातील काही समुहांचा भाग आहे. अशा निरनिराळ्या समुहांपेक्षा एकच जी ऑल तयार केला पाहिजे,” असं ते म्हणाले होते. तसंच गरीबी आणि दहशतवादाविरोधात बोलताना त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला होता.


हे ही वाचा – चीनविरोधात अमेरिका आक्रमक; ट्रम्प यांची हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर स्वाक्षरी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -