घरताज्या घडामोडीCovid-19 Third Wave: पंतप्रधान मोदींची आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Covid-19 Third Wave: पंतप्रधान मोदींची आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Subscribe

कोरोना तिसऱ्या लाटेची शक्यता आणि दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवताना करत असलेले लसीकरण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या सहा राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेच्या दरम्यान सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव होता. अजून येथे कोरोनाचे आकडे स्थिर आहेत, मात्र कमी होत नाही आहेत. त्यामुळे आज सकाळी ११ वाजता मोदी यांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार आहे.

या सहा राज्यांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, ओडिसा आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. व्हर्च्युअल पद्धतीने सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतत बैठक पार पडणार आहे.

- Advertisement -

मंगळवारी ईशान्यकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हिल स्टेशन आणि बाजारापेठांमध्ये होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मायक्रो-कंटेन्ट झोनवर भर देण्याचेही सांगितले होते.

- Advertisement -

दरम्यान देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५४२ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ४० हजार २६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १० लाख २६ हजार ८२९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख १२ हजार ५३१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १ लाख ८३ हजार ८७६ जण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या देशात ४ लाख ३० हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -