निवृत्तीनंतर मिताली राजला पत्राद्वारे पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) माजी कर्णधार मिताली राजने (Mitali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) ८ जून रोजी निवृत्ती घोषित केली. मितालीने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत १० हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women Cricket Team) माजी कर्णधार मिताली राजने (Mitali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) ८ जून रोजी निवृत्ती घोषित केली. मितालीने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत १० हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. मितालीने निवृत्ती घेतल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका पत्राद्वारे मिताली राज हिला शुभेच्छा दिल्या आहेत. मितालीने तिच्या ट्विटर हँडलवरून हे पत्र शेअर करत स्वत: पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच, नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

नरेंद्र मोदी यांनी दिलेले पत्र मितालीने ट्विट करत लिहिले की, “आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडून एवढं प्रेमळ प्रोत्साहन मिळणं ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदीजी माझ्यासह लाखो लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्याच्या प्रोत्साहनाच्या शब्दांनी मी भारावून गेलो आहे.”

तसेच, “काही आठवड्यांपूर्वी तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन लाखो चाहत्यांची मने तोडली होती. सर्वप्रथम, ज्या करोडो लोकांमध्ये सामील होऊन तुम्ही देशाचा गौरव केला आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात”, असे मोदी यांनी मितालीला दिलेल्या पत्रात लिहिले आहे.

याशिवाय “मोदी यांनी त्यांना दुसऱ्या डावासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्ही निवृत्तीनंतरच्या दुसऱ्या डावाबद्दल बोललात. हा तुमच्या वृत्तीचा पुरावा आहे ज्याने तुम्हाला इतके दिवस क्रिकेट खेळण्यास मदत केली. तुम्ही खेळाविषयी किती उत्कट आहात याचाही तो पुरावा आहे. भविष्यात तुम्ही काहीही निवडाल, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याने लिहिले आहे की, तू आता भारतासाठी खेळणार नाहीस, पण मला आशा आहे की, आगामी काळातही तू भारतीय खेळासाठी आपले योगदान देत राहशील”, असेही लिहिले आहे.


हेही वाचा – अन् थोडक्यात अनर्थ टळला; ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात येताच कोसळला स्टँड