कौशल्य विकास योजना; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या विशेष प्रसंगी राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गजांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोदींना ७१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने शुक्रवारी रेल्वे कौशल विकास योजना सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. माध्यमांशी बोलताना वैष्णव यांनी असे सांगितले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी केवळ भारतालाच नव्हे तर जगाला दिशा दिली आहे.

पुढे ते असेही म्हणाले, ‘आज रेल्वे आमच्या पंतप्रधानांना एक छोटी भेट देत आहे. वंचित लोकांचा कौशल्य विकास आणि प्रगती त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. हे लक्षात घेऊन आम्ही रेल्वे कौशल्य विकास योजना सुरू करत आहोत, जी ५० हजार लोकांना कौशल्यांचे प्रशिक्षण देणार असून ही योजना सर्वांसाठी मोफत आहे.

या योजनेशी संबंधित कार्यक्रम दूरच्या ठिकाणी आयोजित केले जात आहेत जेथे अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. दरम्यान, एक मोबाइल कौशल्य विकास युनिट देखील तयार करणार असून जे दुर्गम भागात प्रवास करू शकेल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळवायचा आहे तेथे लोकांना रोजगार मिळवण्याचे प्रशिक्षण देणे हा हेतू या योजनेमागचा आहे. यासाठी चार ट्रेड ठरवण्यात आले आहेत, जे फिटर, वेल्डर, मशीनिंग आणि इलेक्ट्रिशियन असे असून हे चारही कोणत्याही उद्योगात खूप महत्वाचे आहेत. लोकांना अजूनही रेल्वेद्वारे माजी प्रशिक्षणार्थी अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळते. पूर्वी सर्व प्रशिक्षणार्थी रेल्वेमध्येच नोकरी करायचे, पण आता तसे राहिले नाही. तरीसुद्धा, या लोकांना सर्व चाचण्यांमध्ये तीस टक्के सूट मिळत असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.


IRCTC Apprentice 2021: दहावी पास आहात! नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी करा आजच अर्ज