घरदेश-विदेशमला तू ओळखतेस का? असे पंतप्रधान मोदींनी विचारताच ८ वर्षीय बालिका म्हणाली...

मला तू ओळखतेस का? असे पंतप्रधान मोदींनी विचारताच ८ वर्षीय बालिका म्हणाली…

Subscribe

नवी दिल्ली : एका आठ वर्षीय बालिकेसाठी आजचा दिवस खास होता. कारण ती पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटली आणि तिने पंतप्रधानांशी बेधडक गप्पा मारल्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील खासदार अनिल फिरोजिया यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधानांची संसदेत भेट घेतली. त्यावेळी त्यांची मुलगी अहाना फिरोजिया हिच्या मोदींशी गप्पा रंगल्या.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहानाला विचारले, ‘तू मला ओळखतेस का?’ त्यावर अहाना म्हणाली, ‘हो ओळखते. तुम्ही नरेंद्र मोदी आहात. तुम्ही टीव्हीवर रोज दिसता. तुम्ही लोकसभा टीव्हीमध्ये नोकरी करता.’ हे ऐकून सर्वांनाच हसू फुटले. त्यानंतर तिच्याशी पंतप्रधानांच्या गप्पा रंगल्या. परत जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. तिला त्यांनी चॉकलेट्स दिले.

अनिल फिरोजियाचे कौतुक
खासदार अनिल फिरोजिया यांनी वजन कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पण त्याचबरोबर आणखी बजन ककरमी करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
केंद्रीय परिवहनमंत्री नितिन गडकरी यांच्यामुळे अनिल फिरोजिया यांनी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. २४ फेब्रुवारीला नितिन गडकरी उजैनला गेले होते. विकासकामांच्या घोषणा करताना त्यांनी फिरोजिया यांना तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या क्षेत्रातील विकासकामांसाठी प्रत्येक किलोमागे १ हजार कोटी रुपये द्यायला लावू, असे आव्हान गडकरी यांनी त्यांना दिले होते. हे आव्हान स्वीकारत अनिल फिरोजिया यांनी आतापर्यंत तब्बल २१ किलो वजन घटविले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत होतात, आपण काय करणार; शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर अजित पवारांची टीका

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -