कोरोनाशी लढणाऱ्या भारतावर WHO सह जगभरातून होतोय कौतुकाचा वर्षाव – पंतप्रधान

आज भारतीय जनता पार्टीचा ४० वा स्थापना दिवस असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.

PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाशी लढण्याकरता भारताने कंबर कसली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. भारताने वेळीच कोरोना सारख्या आजाराचे गांभीर्य ओळखले आणि उपाययोजना केल्या. त्यासाठी सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तर WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनीही आपले कौतुक केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हिडिओ मेसेजद्वारे म्हटले आहे. भाजपाचा आज ४० वा स्थापना दिवस असून त्यानिमित्ताने पंतप्रधानांनी हा व्हिडिओ जारी केला आहे.

तसेच केंद्र सरकारने कोरोनाबाबत कठोर निर्णय घेतले असून जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. कोरोनाशी लढा देताना आपण गरिबीशी लढतो आहोत, ही बाबही महत्त्वाची आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे. त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचे धैर्य पाहायला मिळाले. असंख्य दिव्यांनी कोरोनाचा अंधार दूर केला, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

तर भारतीय जनता पार्टीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा झाला आहे. हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. त्याग, तपस्या आणि बलिदान या तीन तत्त्वांवर भाजपा हा पक्ष उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

हेही वाचा –

Coronavirus: आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर करणार कोरोनाग्रस्तांवर उपचार