घरदेश-विदेशविरोधकांच्या घोषणाबाजीत PM मोदींच 90 मिनिटांचं भाषण; काँग्रेसवरील टीकेचे 10 मुद्दे

विरोधकांच्या घोषणाबाजीत PM मोदींच 90 मिनिटांचं भाषण; काँग्रेसवरील टीकेचे 10 मुद्दे

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेनंतर राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला केला. मोदी भाषणासाठी उभे राहण्याआधीपासून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत गोंधळ घातला. यावेळी मोदींनी भाषणाच्या सुरुवातीपासून काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कोणत्याही कार्यक्रमात नेहरुजींचे नाव घेतले नाही, तर काही लोकांचे केस उभे राहायचे, रक्त गरम व्हायचे, असा टोमणा मोदींनी काँग्रेसला मारला आहे.

तसेच त्यांच्या पिढीतील व्यक्ती नेहरु आडनाव ठेवण्यास का घाबरतात हे समजत नाही. नेहरु आडनाव असायला काय लाज आहे. एवढी महान व्यक्ती तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान्य नाही आणि तुम्हगी आमचा हिशोब मागता म्हणत मोदींनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. विरोधकांच्या घोषणाबाजीतही आज मोदींनी जवळपास 90 मिनिटं भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी काँग्रेसवर 10 वेगवेगळ्या मुद्द्यावरून टीका केली आहे, त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर केलेल्या 10 टीकेतील मुद्दे कोणते आहेत जाणून घेऊ…

- Advertisement -

1) 60 वर्षांपासून काँग्रेस परिवाराने खड्डे केले

मोदी म्हणाले कीस  विरोधी पक्षातील खर्गे म्हणाले की, 60 वर्षांत काँग्रेसने देशाचा मजबूत पाया रचला. आम्ही पाया रचला मात्र त्याचं श्रेय मोदींनी घेतलं ,अशी त्यांची तक्रार आहे. पण 2014 मध्ये काही गोष्टी बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा 60 वर्षांपासून काँग्रेस परिवाराने खड्डे केल्याचचं दिसून आलं. त्यांचा तो हेतू नसावा, पण त्यांनी खड्डा केला. खड्डा खोदत असताना त्यांनी 6 दशकं वाया घालवली. त्यावेळी जगातील छोटे छोटे देशही यशाच्या शिखरांना गवसणी घालत होते.

- Advertisement -

2) काँग्रेसकडून शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर

पंतप्रधान मोदी म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी काय धोरण आहे. काही उच्चवर्गीयांना सांभाळत त्यांच्यामार्फत राजकारण चालवण्याचा त्यांचा हेतू होता. लहान शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले, पण त्यांचा आवाज कोणी ऐकला नाही. मात्र भाजप सरकारने छोट्या शेतकऱ्यांकडे लक्ष केंद्रित केले, त्यांनी बँकिंग क्षेत्राशी जोडले. आज किसान सन्मान निधीतून वर्षाला 3 वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत.

3) काँग्रेसने 90 वेळा निवडून आलेली राज्य सरकारे पाडली

विरोधी पक्षात बसलेल्यांनी राज्यांचे अधिकार हिरावून घेतले. सत्तेत कोण होते, कोणता पक्ष होता, कलम 357 चा वापर कोणी केला? 90 वेळा निवडून आलेली सरकारं पाडली, ते कोण आहेत? हे कोणी केले? इतकेच नाही तर एक पंतप्रधानाने कलम 356 चा 50 वेळा वापर केला त्या म्हणजे इंदिरा गांधी, 50 वेळा सरकार पाडण्यात आली.

केरळमधील जे आज त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यावेळी डाव्या विचारसरणीचं सरकार होत, जे नेहरुजींना आवडले नाही आणि त्यांनी ते पाडले. तामिळनाडूत एमजीआर, करुणानिधी, यांसारख्या दिग्गजांची सरकारेही काँग्रेसवाल्यांनी उद्ध्वस्त केली, तुम्ही कुठे उभे आहेत, ते एमजीआर यांच्या आत्मा पाहतोय.

मागे सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य शरद पवार आहेत. वयाच्य़ा 35- 40 व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचेही सरकार पाडले. आज तेही आहेत. काही लोकांनी ज्योतिषांच्या सांगण्यावरून नाव आणि कपडे बदलले असतील. एनटीआर आजारपणामुळे अमेरिकेत गेले त्यावेळी याच लोकांनी त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसच्या राजकारणाचा हा दर्जा होता, असा आरोप मोदींनी केला आहे.

4) काँग्रेसने राजभवनाचं पक्ष कार्यालयात रुपांतर केलं

मोदींनी काँग्रेसला टार्गेत करत म्हटले की, राजभवनाचं काँग्रेसने पक्ष कार्यालयात रुपांतर केलं. 2005 मध्ये झारखंडमध्ये एनडीएच्या जास्त जागा होत्या, परंतु राज्यपालांनी यूपीएला बोलावले. 1982 मध्ये भाजप आणि देवीलाल यांच्यात निवडणूकपूर्व करार झाला होाता. राज्यपालांनी काँग्रेसला बोलावले होते, आजही काँग्रेस देशाची दिशाभूल करत आहे, असा आरोपही मोदींनी केला आहे.

5) लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा अपमान

विरोधकांनी लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, लेखातून, टीव्हीच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात बोलले गेले. हे लोकं विज्ञान, तंत्रज्ञान विरोधी आहेत. त्यांनी शास्त्रज्ञांची बदनामी करण्याची एक संधी सोडली नाही. आज आमचे तरुणांकडून नवनवीन संशोधन सुरु आहे पण त्यांची बदनामी सुरु आहे. त्यांना देशाची नाही तर राजकारणाची चिंता आहे. आज माझ्या देशातील नागरिकांच्या हातात 100 कोटींहून अधिक मोबाइल आहेत याचा आनंद आहे. एकेकाळी आपण मोबाईल आयात करायचो, पण ते आज निर्यात करतो याचा अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले.

6) वारंवार नाकारल्याने काँग्रेस कारस्थान करत

देश काँग्रेसला वारंवार नाकारतोय, पण त्यांचे कारस्थान करण्याचं काही थांबत नाही. जनता पाहतेय आणि काँग्रेसला प्रत्येक संधीवर शिक्षा करतेय. 1857 ते 2014 पर्यंतचा भारताचा कोणताही भाग घ्या. स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचे योगदान सुवर्णपानांनी भरलेले आहे. अनेक दशके आदिवासी बांधव विकासापासून वंचित राहिले. त्यांच्यासाठी विश्वासाचा पूल कधीच बांधलाच गेला नाही. तरुणांच्या मनात सरकारांबाबत वारंवार प्रश्न निर्माण होत राहिले. जर काँग्रेसने आदिवासी कल्याणासाठी समर्पण भावनेतून आणि योग्य हेतूने काम केले असते, तर मला 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात इतके कष्ट करावे लागले नसते. अटलबिहारी सरकारमध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि स्वतंत्र बजेटची व्यवस्था करण्यात आली होती, असही मोदींनी नमूद केलं.

7) कोणत्याही आव्हानांचा कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही

पंचायत ते संसदेपर्यंत त्यांचा संसार चालायचा. देशानेही त्यांना आंधळेपणाने साथ दिली, पण त्यांनी अशी कार्यशैली आणि संस्कृती निर्माण केली की, एकाही आव्हानावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. प्रयत्नांमुळेच आपल्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. आज आपण कायमस्वरूपी समाधानाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. काँग्रेसने कोणत्याही आव्हांनाला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण आम्ही आव्हान पाहून पळून जाणारे लोकं नाहीत, असा टोलाही मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.

8) जुन्या सिस्टिमचा फायदा मिळणारे आता ओरडतायत

काँग्रेस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत मोदी म्हणाले की, काँग्रेसने बँकांचे एकत्रीकरण गरिबांना बँकांचे हक्क मिळावेत या उद्देशाने केले होते, परंतु देशातील निम्म्याहून अधिक लोकांना बँकेच्या दारापर्यंतही पोहोचता आलं नाही. आमच्या सरकारने थेट लाभार्थींना जन-धन खात्यात पैसे पाठवले. नवीन इको सिस्टीम आणली. मात्र ज्यांना जुन्या इको सिस्टीमचे फायदे मिळायचे ते रडू लागले. पूर्वी प्रकल्प लटकायचे, अडकायचे, भटकायचे.. आज आठवडाभरात आराखडा तयार होतो. यासाठी आम्ही एक तंत्रज्ञान मंच तयार केला आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू आहे

9) गरिबी हटवण्यासाठी काही केलं नाही

कोणतही सरकार सत्तेत आल की, ते देशासाठी काहीतरी करण्याचं आश्वासनं घेऊन येतं. जनतेचं भलं करण्याचं आश्वासन घेऊन येतं. फक्त भावना व्यक्त करुन फायदा होत नाही. गरिबी हटवा असे एकेकाळी सांगितले जात होते, मात्र 4 दशकांत काहीही केलं नाही. विकासाचा वेग, हेतू, दिशा, प्रयत्न, आणि परिणाम काय आहेत हे माहितं असणं खूप महत्त्वाचं आहे. जनतेच्या गरजांसाठी मेहनत केली तर दडपण वाढते, जास्त मेहनत करावी लागते. गांधीजी म्हणायचे, श्रेय आणि प्रेम. आम्ही श्रेयाचा मार्ग निवडला आणि प्रिय वाटणारा मार्ग सोडला. रात्रंदिवस मेहनत केली पण जनतेच्या आशांना तडा जाऊ दिली नाही, असही मोदींनी सांगितलं.

10) व्होट बँक नाही म्हणून नॉर्थ ईस्टमध्ये वीज नाही

पंतप्रधान म्हणाले की, गावांत वीज नव्हती. दुर्गम गावं, ईशान्येकडील गावं, डोंगराळ भागातील गावं याठिकाणी जास्त व्होट बँक नव्हती म्हणून तिथे वीज पुरवण्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही लोण्यावर नव्हे तर दगडावर रेघ काढू असे सांगितले. आम्ही 18 हजार गावांना वीज पुरवली. त्यांचा विकास झाला आणि देशाच्या व्यवस्थेवरील विश्वास वाढला. तो विश्वास आम्ही जिंकला आहे. आम्ही खूप मेहनत घेतली स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर दुर्गम गावांना आशेचा किरण दिसला याचा आनंद आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये वीज काही तासांसाठी यायची. पूर्वी ते गावात खांब गाडायचे, नंतर दरवर्षी त्याची जयंती करायचे. आज आपण 22 तास वीज देऊ शकलो, आम्ही लोकांना त्यांच्या नशिबावर सोडले नाही. राजकीय नफा-तोट्याचा विचार न करता देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा मार्ग निवडला. कठोर परिश्रमाचा मार्ग निवडला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर, कुठे कुठे देणार भेटी?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -