घरताज्या घडामोडी'सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशी करा', खासदारांच्या पत्राला मोदींनी दिले उत्तर

‘सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशी करा’, खासदारांच्या पत्राला मोदींनी दिले उत्तर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवर सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही आत्महत्या आहे की एखादं षडयंत्र आहे याचा शोध घेण्यासाठी सुशांतच्या कुटूंबापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेकांची चौकशी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. परिणामी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. त्यांच्या या पत्राला आता नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे.

- Advertisement -

काय दिले पंतप्रधानांनी उत्तर?

‘आम्हाला तुमचं पत्र २० जुलै रोजी मिळाले’, असे उत्तर त्यांनी एका पत्राद्वारे दिले आहे. मोदींचे पत्र सध्या सर्वत्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची नोंद घेतल्यामुळे आता सुशांतच्या केसला आणखी गती प्राप्त होईल आणि खरे गुन्हेगार लवकरच पकडले जातील’, असे म्हटले जात आहे.

‘तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची कल्पना आहेच. माझे सहकारी इशकराम भंडारी यांनी सुशांत सिंहच्या कथित आत्महत्येच्या परिस्थितीसंबंधी रिसर्च केला आहे. पोलीस एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांत सिंहने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास करत आहेत. पण, मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचे दुबईतील डॉनशी संबंध आहेत ते पोलिसांकडून ही ऐच्छिक आत्महत्या होती हे दाखवण्यासाठी मदत मागत आहेत’, असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यांच्या या पत्राची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महेश भट्टसह करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -