घरदेश-विदेशऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका

ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका

Subscribe

या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तान समर्थकांनी तोडफोड केली होती. यापूर्वी जानेवारी महिन्यातही ऑस्ट्रेलियात मंदिरांवर हल्ला झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दोऱ्यावर आहेत. बुधवारी (ता. 24 मे) पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भविष्यात अशा घटनांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मोदींना दिले. ऑस्ट्रेलियन समकक्षांसोबत संयुक्त बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर चर्चा केली आहे. आजही आम्ही या विषयावर चर्चा केली. आम्ही अशा घटना मान्य करणार नाही. (PM Narendra Modi aggressive stance on the attack on temples in Australia)

हेही वाचा – पीटीआयचे ‘हे’ मोठे नेते नजरकैदेत, रावळपिंडी प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे दिले कारण

- Advertisement -

याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना त्यांच्या कृतीने किंवा विचारांनी हानी पोहोचवणारा कोणतीही घटना स्वीकारण्यात येणार नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी आज पुन्हा एकदा मला आश्वासन दिले की ते भविष्यात घटनांवर कठोरात कठोर कारवाई करतील.”

ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच खलिस्तानी अतिरेकी आणि खलिस्तानी कार्यकर्ते आणि भारताला समर्थन देणाऱ्या आंदोलकांच्या बाबतीतली अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीय झेंडे जाळण्यात आले आणि एका हिंदू मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. तत्पूर्वी, मार्चमध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या अल्बानीज यांनी सांगितले होते की, ऑस्ट्रेलिया कोणत्याही अतिरेकी कारवाया आणि धार्मिक वास्तूंवर हल्ले सहन करणार नाही आणि हिंदू मंदिरांविरुद्ध होणाऱ्या कोणत्याही घटना सहन करणार नाही.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आपल्या भारतीय समकक्षांना दिलेल्या आश्वासनाबाबत एका माध्यमाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “मी त्यांना आश्वासन दिले आहे. ऑस्ट्रेलिया हा लोकांच्या विश्वासाचा आदर करणारा देश आहे. त्यामुळे मी दिलेले आश्वासन पाळणार आहे. आम्ही अशा पद्धतीच्या हल्ल्यांना कधीही सहन करणार नाही. अशा घटनांना ऑस्ट्रेलियात स्थान नाही. मग ते मंदिर अशो, मशीद असो किंवा चर्च असो. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही.”

“आम्ही आमच्या देशातील पोलीस आणि सुरक्षा एजन्सींच्या माध्यमातून प्रत्येक योग्य ती कारवाई करू. ज्यामुळे अशा घटनांना जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू आणि त्या व्यक्तीला त्या कारवाईला सामोरे जावे लागेल. आम्ही एक सहिष्णु बहुसांस्कृतिक राष्ट्र आहोत आणि अशा कृत्यांना ऑस्ट्रेलियात स्थान नाही.” असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -