घरदेश-विदेशMahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्त पंतप्रधान मोदी व राहुल...

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्त पंतप्रधान मोदी व राहुल गांधींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महात्मा गांधींचे स्मरण करणारी पोस्ट करत हिंदुत्वावर निशाणा साधला आहे

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहतो आहे. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद , गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्ली येथील राजघाटावर जाऊन आदरांजली अर्पण केली. याच दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याशिवाय इतर दिग्गज नेते देखील महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते.

महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय करण्याचं पंतप्रधान मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी म्हटले की, महात्मा गांधींचे विचार लोकप्रिय बनवण्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांचे आदर्श आणि विचारांना लोकप्रिय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हुतात्मा दिनाच्या दिवशी मी या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन करतो, त्यांच्या सेवा आणि धैर्याचं कायमच स्मरण केले जाईल, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

- Advertisement -

अमित शहा यांच्याकडून अभिवादन

गृहमंत्री अमित शहा यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विट करत म्हटले की. महात्मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वदेशी, स्वभाषा आणि स्वराज्याची प्रेरणा जागवली. त्यांचे विचार आणि आदर्श कायम सेवेसाठी प्रेरित करत राहतील, असं म्हणत अमित शहा यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महात्मा गांधींचे स्मरण करणारी पोस्ट करत हिंदुत्वावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, ‘एका हिंदुत्ववादीने गांधींना गोळ्या घातल्या. गांधी राहिले नाहीत असे सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटते. जिथे सत्य आहे, तिथे बापू जिवंत आहेत! #GandhiForever


Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा यू-टर्न; आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून केला आत्मक्लेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -