घरताज्या घडामोडीपीएम नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सोशल मीडिया अकाऊंटचे बदलले डीपी, जाणून...

पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सोशल मीडिया अकाऊंटचे बदलले डीपी, जाणून घ्या कारण?

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले आहेत. डीपीच्या जागेवर राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी डीपीच्या जागी राष्ट्रध्वजाचा फोटो लावल्यानंतर इतरांनीही असे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं होतं. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जन आंदोलनात बदलत आहे. देशवासियांनी २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या काळात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाईल फोटो आणि डीपी हे तिरंग्याचे असावेत, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते.

- Advertisement -

नरेंद्र मोदींचे आवाहन

- Advertisement -

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. अशा स्थितीत आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी सामूहिक मोहिमेंतर्गत घर-घर तिरंगा यासाठी आपण तयार आहोत. मी माझ्या सोशल मीडियाच्या पेजवरील डीपी बदलला आहे, त्यामुळे आपणही असे करावे, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

अमित शाहांनी बदलला डीपी

अमित शाह यांनीही आपल्या सोशल मीडियावरील पेजच्या डीपीवर तिरंगा लावला आहे. ट्विट करत त्यांनी स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आठवणीत राहावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या सर्व सोशल मीडिया प्रोफाईलवर तिरंगा लावल्याचे सांगितले आहे.


हेही वाचा : देशाची संपत्ती मित्रांना फ्री फंडमध्ये विकताहेत, राहुल गांधींचा मोदींना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -