घरदेश-विदेशकोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कुंभ प्रतिकात्मक करा, PM मोदींचे साधु-संतांना आवाहन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कुंभ प्रतिकात्मक करा, PM मोदींचे साधु-संतांना आवाहन

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या महा कुंभमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. यादरम्यान श्री पंच निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचे कोरोनाने निधन झाले. तसेच अनेक साधु-संत कोरोनाबाधित झाले. या पार्श्वभूमीवर हरिद्वारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभदरम्यान होणाऱ्या अनियंत्रित कोरोना संसर्गाबाबत भाष्य केले आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे कुंभला प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

यासंदर्भात शनिवारी मोदींनी एक ट्विट केले. आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यांशी आज फोनवर बोलणे झाले, “सर्व संतांच्या आरोग्याबद्दल माहिती घेतली. साधू संत प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करत आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आतापर्यंत दोन शाही स्नान झाले. कोरोंनाच्या वाढत्या संसर्गामुळे कुंभ हे प्रतिकात्मक व्हावे, अशी विनंती केली आहे. जेणेकरून या संकटाविरूद्धच्या लढाईला बळ मिळेल.”

- Advertisement -

 

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी संवाद साधल्यानंतर स्वामी अवधेशानंद यांनीही भाविकांनी मोठ्या संख्येने स्नान करण्यासाठी येऊ नये, तसेच सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले की, “माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही आदर करतो. जीवनाचे रक्षण करणे हे एक पुण्य आहे. माझे जनतेला आवाहन आहे की, कोविडच्या वाढत्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता स्नानासाठी कोणीही येऊ नये. तसेच कोरोनाचे नियम पाळण्याचे देखील आवाहन करीत आहेत. ”


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -