UP Election 2022 : परिवारवादी पक्षाच्या हातात देश सुरक्षित नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बुधवारी मंझनपूर जिल्हा मुख्यालयातील पोलीस लाईनच्या मागे मैदानात जाहीर घेण्यात आली. यामध्ये मोदी म्हणाले की, परिवारवादी पक्षाच्या हातात देश सुरक्षित नाही, असा हल्लाबोल नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

परिवारवादी पक्षाच्या हातात देश सुरक्षित नाही. राष्ट्रहिताचे काम करताना खूप त्रास होतो. यावेळी त्यांनी सपा सरकारच्या कार्यकाळावर सडकून टीका केली आहे. सरकारच्या काळात खाण घोटाळा, रूग्णवाहिका घोटाळा, अन्नधान्य घोटाळा आणि रिव्हरफ्रंट घोटाळा झाला आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दहशतवाद्यांना वाचवण्याचे काम सरकारने केले आहे, असं मोदी म्हणाले.

कोशांबीच्या सर्व बंधू भगिनींना जय सियाराम असं म्हणत मोदी म्हणाले की, ही भूमी संत मलूकदास, माता, रत्नावली, दुर्गा भाभी यांसारख्या महान व्यक्तींची भूमी आहे. गंगा आणि यमुनाने सिंचित केलेल्या पवित्र भूमिला मी आदरपूर्वक नमस्कार करतो आणि प्रणाम करतो, असं म्हणत मोदींनी भाषणाला सुरूवात केली.

राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यूपीची जनता भाजपच्या विजयासाठी पुढे सरसावत आहे. यूपींच्य लोकांमध्ये फूट पडेल असे ज्यांना वाटते त्यांना उत्तर देण्यासाठी यूपीत लोक लांबच लांब रांगेत उभे आहेत. कोणताही देश असो किंवा राज्य असो, आपल्याला जर पुढे जायचे असेल तर लोकांना एकत्र आणावे लागेल. भारताच्या आणि यूपीच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Grandmaster Praggnanandhaa : जगज्जेत्या कार्लसनचा पराभव करणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचं पंतप्रधानांकडून कौतुक