१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या संख्येने होत आहे. भारतामध्ये सुद्धा ओमिक्रनच्या रूग्णांची संख्येत वाढ होत आहे. परंतु कोणीही चिंता बाळगू नका. सावध आणि सतर्क रहा. मास्क लावणे आणि हात वारंवार धुणे, या गोष्टी करण्यासाठी कधीच विसरू नये. परंतु कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहून लसीकरण निर्मीतीसाठी भारताने काम करण्यास सुरूवात केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी भारतात सुरूवात करण्यात येण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

व्हायरस जेवढ्या दुपटीने वाढतोय. तेवढा विश्वास सुद्धा द्विगुणित होत आहे. आयसीयू आणि नॉन आयसीयू बेड्स असे एकूण मिळून ९० हजार बेड्स उपलब्ध आहेत. विशेषत: लहान मुलांसाठी देखील आहेत. आज देशभरात तीन हजार पेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन आहेत. चार लाख ऑक्सिजन सिलेंडर्स संपूर्ण देशात देण्यात आले आहेत, असं मोदी म्हणाले.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच मोठं शस्त्र आहे. देशातील गंभीर परिस्थिती पाहून लसीकरण निर्मीतीसाठी भारताने काम करण्यास सुरूवात केली होती. १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात भारतात सुरूवात करण्यात येणार आहे. नवीन वर्षातील २०२२ मध्ये ३ जानेवारीपासून लहान मुलांना लस देण्यास सुरूवात केली जाणार आहे. कोरोना विरूद्ध लढण्य़ासाठी भारत अधिक सक्षम होईल. त्याचप्रमाणए शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी मिटेल.

आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार

जे कोरोना योद्धा आहेत. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठं योगदान आहे. ते आज सुद्धा कोरोना बाधित रूग्णांना मदत करत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.


हेही वाचा : Merry Christmas 2021: महेंद्र सिंह धोनी पत्नीसोबत करतोय ख्रिसमस