घरदेश-विदेशयंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नरेंद्र मोदींना? नोबेल समिती सदस्यांनी दिली 'हे' स्पष्टीकरण

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नरेंद्र मोदींना? नोबेल समिती सदस्यांनी दिली ‘हे’ स्पष्टीकरण

Subscribe

यंदाच्या या नोबेल शांतता पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोद प्रबळ दावेदार असू शकतील, अशी चर्चा सध्या वेगाने पसरू लागली आहे.नोबेल समितीचे सदस्य ॲस्ले तोजे यांनी एक स्पष्टीकरण दिलंय.

जगभरातील सर्वात मानाचा आणि बहुप्रतिक्षित पुरस्कार म्हणजे नोबेल शांतता पुरस्कार. यंदाच्या या नोबेल शांतता पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोद प्रबळ दावेदार असू शकतील, अशी चर्चा सध्या वेगाने पसरू लागली आहे. नोबेल समितीचे सदस्य ॲस्ले तोजे यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र नरेंद्र मोदींना नोबेल शांतता पुरस्काराच्या चर्चा रंगू लागल्यानंतर अखेर तोजे यांनी पुढे येत आपण असा दावा केल्याच नसल्याचं सांगितलं आहे. मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात अशा त्यांच्या वक्तव्याची बातमी ही खोटी असल्याचं देखील तोजे यांनी स्पष्ट केलंय.

नोबेल समितीचे सदस्य ॲस्ले तोजे यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. “एका बनावट बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. त्या सर्व बातम्यांना आपण बनावट मानलं पाहिजे. ते खोटं वृत्त आहे आणि त्यावर आपण चर्चा करायला नको. त्यावर चर्चा करून त्याला हवा पाणी द्यायला नको. त्या ट्विट्समध्ये जे काही नमूद केलेलं ते वक्तव्य माझं नव्हतं. त्या विधानाचं मी स्पष्टपणे खंडन करतो,” असं तोजे यांनी म्हटलं.

- Advertisement -

नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जाणाऱ्या या शांतता पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी हे प्रबळ दावेदार असू शकतात असं वक्तव्य तोजे यांनी केल्याची बातमी समोर आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विश्वासार्ह नेतृत्त्व असून ते दोन देशांमधील युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करु शकतात, असे तोजे यांनी म्हटल्याची चर्चा आधी सुरू होती. पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांच्यासारख्या सक्षम नेत्याच्या दृष्टीने तो ऐतिहासिक क्षण ठरेल. नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळेच भारत आजघडीला संपन्न आणि सामर्थ्यशाली देशांच्या पंक्तीत विराजमान आहे, अशी स्तुतीसुमने ॲस्ले टोजे यांनी उधळल्याचं बोललं जात होतं.

- Advertisement -

नोबेल समितीच्या उपनेत्यानेच प्रबळ दावेदारी व्यक्त केल्यामुळे यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणार असा अंदाज बांधण्यास सुरूवात झाली होती. नरेंद्र मोदी हे केवळ भारतालाच पुढे नेत नाहीत तर ते जगात शांतता नांदण्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भारताकडून सुरु असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. नरेंद्र मोदी हे जगातील शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याचे मत टोजे यांनी व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं होतं.

परंतू तोजे यांनी आपण असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नरेंद्र मोदींना मिळणार, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -